शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पाटणेतील शेतकरी आक्रमक

By admin | Updated: December 12, 2015 00:25 IST

दोन वर्षे कारवाईच नाही : गूळ व्यापाऱ्यांकडून बारा लाखांचा गंडा

कोल्हापूर : गूळ घालून दोन वर्षे उलटले तरी अद्याप व्यापाऱ्यांकडून एक दमडीही हातात पडलेली नसल्याने हवालदिल झालेल्या पाटणे (ता. शाहूवाडी) येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी समिती प्रशासनाला धारेवर धरले. केवळ कर गोळा करण्यासाठीच समिती आहे काय? गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई काय केली? अशी विचारणाही शेतकऱ्यांनी केली.पाटणे येथील बारा शेतकऱ्यांनी स्वामी समर्थ ट्रेडर्स व गणेश ट्रेडर्स यांच्या अडत दुकानात गूळ विक्रीसाठी लावला होता. डिसेंबर २०१३ मध्ये गुळाची विक्री झाली; पण अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळालेले नाहीत. याबाबत बाजार समितीकडे लेखी तक्रारीनंतर समितीने संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा काढून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली; पण व्यापाऱ्यांनी पोबारा केला. शेतकऱ्यांनी दबाब वाढविल्यानंतर समितीने परवाना देताना तारण दिलेल्या मालमत्तेवर बोजा चढविला; पण महसुली कारवाई करण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने तसा प्रस्तावही समितीने दिला आहे; पण अद्याप कारवाई झालेली नाही. शुक्रवारी सभापती परशराम खुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या शेतकऱ्यांना घातला गंडाशेतकऱ्याचे नावरुपयेतातोबा ठमके ४,२७५शीला कृष्णात पाटील१,१६,८५०धोंडिराम कृष्णात पाटील५१,८७०सचिन पाटील४५,३१५प्रदीप पाटील३,२०,६२५गोरक्ष पाटील७७,८०५युवराज पाटील२३,३७०आनंदा थोरात १६,२४५हौसाबाई बंडू माने ४२,७५०शेतकऱ्याचे नावरुपयेनामदेव पाटील१९,९५०अशोक पाटील १४,२५०संग्राम पाटील२९,९२५राजाराम पाटील३३,३४५निरंजन पाटील६५,८३५आप्पासाहेब पाटील१७,६७०सुमन पाटील६८,९७०बाबासाहेब पाटील १,४९,६२५लालासाहेब पाटील९८,३२५ स्वामी समर्थ ट्रेडर्स व गणेश ट्रेडर्स या फर्मशी संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. संबंधितांच्या तारण मालमत्तेवर बोजा चढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सप्टेंबर महिन्यातच प्रस्ताव दिलेला आहे.- परशराम खुडे (सभापती, बाजार समिती) आमच्या पैशांसाठी आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता, तरीही दखल घेतलेली नाही. कर्जावरील व्याजाने आमचे कंबरडे मोडले आहे.- आनंदराव थोरात (शेतकरी, पाटणे)