शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

फुलशेतीनं बदललं नशीब! एकेकाळी मजूरी करणारा बळीराजा दिवसाला कमावतोय हजारो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:24 IST

सध्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

नवी दिल्ली : सध्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील एका शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर चित्रकूट जिल्ह्यात फुलांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांचा चेहरा फुलला आहे. या भागात अर्थात धर्मनगरी चित्रकूटमध्ये फुलांचा खप खूप जास्त आहे. पूर्वी ही फुले इतर जिल्ह्यांतून अथवा राज्यांतून येथे येत असत, मात्र आता येथील शेतकरी स्वतः फुलांची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहेत. मात्र, फुलशेती करणारे शेतकरी याआधी परराज्यातून जाऊन मजूरी करायचे. पण आता फुलशेतीने बळीराज्याचे नशीब बदलले आहे. 

दरम्यान, पठारी भागात पीक चांगले येत नव्हते आणि जे काही पीक लावले असायचे ते खराब व्हायचे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी फुलशेती करण्याचा विचार केला आणि आता तो यशस्वी देखील झाला आहे. पूर्वी बाहेरून फुलांची आवक होत असल्याने भाविकांना महागडी फुले खरेदी करावी लागत होती. मात्र, आता चित्रकूट येथील शेतकरी फुलांची लागवड करत आहेत. त्यामुळे भाविकांना कमी पैशात फुले मिळतात. एकीकडे चांगले उत्पन्न मिळाल्याने शेतकरी आनंदी दिसत आहेत, तर दुसरीकडे भाविकांनाही आपल्या कुलदैवताची पूजा करण्यासाठी सहज फुले उपलब्ध होत आहेत. 

शेतकरी म्हणतात... बुंदेलखंड हा अत्यंत मागासलेला भाग असून बुंदेलखंडमध्ये अण्णांची प्रथा अधिक असल्याचे शेतकरी विजय सिंग सांगतात. तसेच इतर पिकांमध्ये खूप अडचण होती, त्यामुळे आम्हाला फुलांची लागवड जास्त सोयीची वाटली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे धार्मिक शहर असल्यामुळे चित्रकूटमध्ये फुलांचा खप जास्त आहे. पूर्वी आम्ही मजूर म्हणून काम करायचो, त्यात आम्हाला काही फायदा दिसत नव्हता. जेव्हापासून आम्ही फुलांची लागवड करायला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही दररोज 5 ते 10 हजार कमावतो, असे स्थानिक शेतकऱ्याने सांगितले. खरं तर शेतकरी विजय सिंग सुमारे तीन एकर फुलांची लागवड करतात. ते सांगतात की, जेव्हापासून त्यांनी फुलांची लागवड करायला सुरुवात केली, तेव्हापासून ते इतर शेतकर्‍यांना फुलांची लागवड करण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशFarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी