Farmer Protest: शेतकऱ्यांचा १८ फेब्रुवारीला देशभरात रेल रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 07:09 IST2021-02-11T03:15:01+5:302021-02-11T07:09:36+5:30
Farmer Protest: दुपारी १२ ते ४ या वेळेत देशात सर्वत्र रेल्वेगाड्या अडवण्यात येतील, असे संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी जाहीर केले.

Farmer Protest: शेतकऱ्यांचा १८ फेब्रुवारीला देशभरात रेल रोको
नवी दिल्ली : कृषी कायदे मागे घ्या यामागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता १८ फेब्रुवारी रोजी देशभर चार तासांच्या रेल रोकोची घोषणा केली आहे.
दुपारी १२ ते ४ या वेळेत देशात सर्वत्र रेल्वेगाड्या अडवण्यात येतील, असे संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी जाहीर केले. याखेरीज १२ फेब्रुवारी रोजी राजस्थानाता टोल गोळा करू दिला जाणार नाही, असेही शेतकरी नेत्यांनी सांगितले. त्यानंतर कदाचित वेगवेगळ्या राज्यांतही असेच आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे.
संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारी रोजी रस्ता रोकोची हाक दिली होती. मात्र त्यात दिल्ली, हरयाणा, पंजाब आदी राज्यांचा समावेश नव्हता. रेल रोको मात्र देशातील सर्व राज्यांत करण्यात येणार आहे, दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सिंघू बॉर्डरवर झालेल्या सभेत जाहीर केले की, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही येथून हटणार नाही.