रानटी जनावरांमुळे बागायतदार

By Admin | Updated: September 3, 2015 00:17 IST2015-09-03T00:17:42+5:302015-09-03T00:17:42+5:30

रानटी जनावरांमुळे बागायतदार संकटात मांद्रे : जंगली श्वापदे आणि माकड यांच्या उपद्रवामुळे पेडणे तालुक्यातील शेती-बागायतदार संकटात सापडला आहे. कष्ट करून उभी केलेली शेती बागायती हे प्राणी उध्वस्त करीत आहेत. राज्य सरकारने याची दखल घेऊन उपाय योजना करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मांद्रे गट कॉँग्रेसचे निमंत्रक नारायण रेडकर यांनी केली आहे. माकड केळी, पपई व इतर पिके खाऊन टाकतात. रानडुक्कर सर्वच उध्वस्त करतात. यामुळे शेती बागायतदार हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात अशा उपद्रवी प्राण्यांना ठार मारण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गोव्यात परवानगी द्यावी अशी मागणी रेडकर यांनी केली आहे. गेली काही महिने शेतकर्‍यांना पीक संरक्षणासाठी बंदूक परवानाही दिला जात नाही. हा परवाना देणे आवश्यक बनले आहे. शेती बागायतीचे नुकसा

Farmers due to wild animals | रानटी जनावरांमुळे बागायतदार

रानटी जनावरांमुळे बागायतदार

नटी जनावरांमुळे बागायतदार संकटात मांद्रे : जंगली श्वापदे आणि माकड यांच्या उपद्रवामुळे पेडणे तालुक्यातील शेती-बागायतदार संकटात सापडला आहे. कष्ट करून उभी केलेली शेती बागायती हे प्राणी उध्वस्त करीत आहेत. राज्य सरकारने याची दखल घेऊन उपाय योजना करावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मांद्रे गट कॉँग्रेसचे निमंत्रक नारायण रेडकर यांनी केली आहे. माकड केळी, पपई व इतर पिके खाऊन टाकतात. रानडुक्कर सर्वच उध्वस्त करतात. यामुळे शेती बागायतदार हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात अशा उपद्रवी प्राण्यांना ठार मारण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर गोव्यात परवानगी द्यावी अशी मागणी रेडकर यांनी केली आहे. गेली काही महिने शेतकर्‍यांना पीक संरक्षणासाठी बंदूक परवानाही दिला जात नाही. हा परवाना देणे आवश्यक बनले आहे. शेती बागायतीचे नुकसान झाले तर पुढील पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण होतो. कृषी खात्याकडून अत्यल्प नुकसान भरपाई मिळते. सरकारने यावर विचार करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असेही रेडकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers due to wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.