न्यायालयाने डल्लेवाल यांचा आरोग्य अहवाल मागवला, एम्सच्या वैद्यकीय मंडळाकडून मत घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 05:22 IST2025-01-16T05:21:15+5:302025-01-16T05:22:44+5:30
जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या आरोग्य अहवालाची प्रत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पंजाब सरकारकडून मागवून घेतली आहे.

न्यायालयाने डल्लेवाल यांचा आरोग्य अहवाल मागवला, एम्सच्या वैद्यकीय मंडळाकडून मत घेणार
नवी दिल्ली : बेमुदत उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या आरोग्य अहवालाची प्रत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पंजाब सरकारकडून मागवून घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्य स्थितीबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या वैद्यकीय मंडळाचे मत विचारात घेतले जाऊ शकते.
१११ शेतकऱ्यांचे उपोषण
केंद्र सरकारच्या मागण्यांबाबत ‘उदासीनतेवर’ टीका करत, १११ शेतकऱ्यांच्या गटाने बुधवारी जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू केले. तसेच त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंताही व्यक्त केली.