शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून राजस्थानमध्ये 30 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे गोमुत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 14:05 IST

पशुपालन करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध उत्पादनाबरोबरच गोमुत्र सुद्धा कमाईचे उत्तम माध्यम बनले आहे.

जयपूर -  राजस्थानमध्ये पशुपालन करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध उत्पादनाबरोबरच गोमुत्र सुद्धा कमाईचे उत्तम माध्यम बनले आहे. राज्यात गो संरक्षणाचे काम करत असलेले सर्व शेतकरी दुधाबरोबरच गोमुत्रसुद्धा बाजारात विकू लागले आहेत. ज्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.  राजस्थानमध्ये गिर आणि थरपरकार या जातीच्या गाईंच्या गोमुत्राला खूप मागणी आहे. त्यामुळे पशुपालकांना या गोमुत्राची चांगली किंमत मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना गाईच्या दुधाचे 15 ते 20 रुपयेच मिळत आहेत तर गोमुत्रासाठी 22 ते 25 रुपये दर मिळत आहे.  गोमुत्राचा वापर जैविक शेतीसाठी होतो. त्यामुळे या क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींकडून गोमुत्राची खरेदी होते. गोमुत्राच्या विक्रीतून माझ्या कमाईत 30 टक्क्यांनी भर पडली आहे, असे जयपूर येथील पशुपालक कैलास गुर्जर यांनी सांगितले.  राजस्थान सरकारच्या अधिनस्थ असलेल्या  महाराणा प्रताप कृषि आणि प्रौद्योगिकी विद्यापीठाकडूनसुद्धा दरवर्षी सुमारे 3500 लीटर ते 6000 लीटर गोमुत्राची खरेदी केली जाते. या गोमुत्राचा वापर विद्यापीठातील जैविक कृषीवर संशोधन तसेच अन्य कामांसाठी केला जातो. गोमुत्राच्या खरेदीसाठी विद्यापीठाने राज्यातील अनेक गोशाळांसोबत करार केलेला आहे.  

टॅग्स :cowगायRajasthanराजस्थान