शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला तर दिल्लीला जायचंच नाही तर खिळे का ठोकताय?; राकेश टिकैत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 13:45 IST

६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासन

ठळक मुद्देचक्का जाममध्ये जनतेला कोणताही त्रास होणार नाही, टिकैत यांंचं आश्नासनआंदोलकांना देण्यात येणारा त्रास थांबवला जात नाही तोवर अधिकृत चर्चा नाही, संयुक्त किसान मोर्चाचं वक्तव्य

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या निरनिराळ्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीलाही हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करण्याच्या तयारीत दिसत आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे. त्यापूर्वी दिल्लीतील निरनिराळ्या सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर खिळे ठोकण्यात येत आहे. यावरून आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला प्रश्न केले आहेत. "आम्हाला तो फोन क्रमांक हवाय ज्यापासून आम्ही एका फोनच्याच दुरीवर आहोत. जेव्हा आपण यापूर्वी दिल्लीला जात होतो तेव्हाही रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले होते. आता आम्हाला दिल्लीला जायचंच नाही तर रस्त्यांवर खिळे का ठोकताय," असा सवाल टिकैत यांनी केला आहे. तसंच यामुळे जनतेला नाहक त्रास होईल, असंही ते म्हणाले. "जेवढे जनतेचे रस्ते बंद होतील तितकंच त्यांनाही समजेल की त्यांच्या रस्त्यात कोण खिळे लावण्याचा प्रयत्न करत आहे. हा अन्नदात्याला संदूकीत बंद करण्याचा कट आहे. हे जनतेला आता समजलं आहे. ६ फेब्रुवारी रोजी जो बंद केला जाणार आहे त्यात जनतेला कोणताही त्रास होणार नाही," असं टिकैत यांनी स्पष्ट केलं. यावेळी शेतकऱ्यांच्या महापंचायतीत येणाऱ्या नेत्यांबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "हा एक मेळावा आहे. या ठिकाणी प्रत्येक जण येत आहे. परंतु या छिकाणी येऊन कोणी मतं मागत नाही. हे आंदोलन तर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतही जाईल. ४-५ दिवसांत हे प्रकरण सोडवलं गेलं नाही तर हे आंदोलन पूर्ण वर्षभर सुरू राहिल," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. संयुक्त किसान मोर्चाकडूनही भाष्यदिल्लीच्या सीमांवर करण्यात येत असलेल्या प्रवेशबंदीवरून संयुक्त किसान मोर्चानंही भाष्य केलं आहे. "जो पर्यंत आंदोलकांना पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून देण्यात येणारा त्रास थांबवला जात नाही तोवर सरकारसोबत कोणतीही अधिकृत चर्चा केली जाणार नाही. निरनिराळ्या राज्यांमधून होत असलेल्या विरोध आणि वाढत असलेली ताकद यामुळे सर्वजण भयभीत झाले आहेत," असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.   राहुल-प्रियंका गांधींकडूनही टीकाकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सीमांवर पोलिसांद्वारे करण्यात येत असलेल्या तयारीची काही छायाचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरू शेअर केली आहे. "भारत सरकार, भिंती उभारू नका, पूल उभारा," असं कॅप्शनही त्यांनी या फोटोंना दिलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच पंतप्रधान महोदय, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असं कॅप्शनही त्यांनी त्याला दिलं आहे.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीPoliceपोलिसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस