शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी आंदोलकांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा धक्का, शंभू बॉर्डरबाबत दिले असे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 17:34 IST

Farmer Protest: देशाची राजधानी दिल्लीमध्ये येऊन आंदोलन करण्याची तयारी करत असलेल्या आंदोलन शेतकरी आणि शेतकरी संघटानांना सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा धक्का दिला आहे. शंभू बॉर्डर खुली होणार नाही. तेथील परिस्थिती जैसे थे राहील, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये येऊन आंदोलन करण्याची तयारी करत असलेल्या आंदोलन शेतकरी आणि शेतकरी संघटानांना सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा धक्का दिला आहे. शंभू बॉर्डर खुली करण्याच्या पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाच्या निर्णयाला हरयाणा सरकारने  सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शंभू बॉर्डर खुली होणार नाही. तेथील परिस्थिती जैसे थे राहील, असे आदेश दिले आहेत.

शेतकरी आणि सरकारमध्ये परस्परांवरील विश्वासाची कमतरता आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. तसेच ही कमतरता दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी कोर्टाने एक स्वतंत्र समिती बनवण्याचा प्रस्तावही दिला आहे. या समितीनमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश असेल. तसेच ते शेतकरी आंदोलकांशी चर्चा करतीत, असे कोर्टाने सांगितले.  न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, काही निष्पक्ष पंचांची आवश्यकता आहे. जे शेतकरी आणि सरकारमध्ये विश्वास निर्माण करू शकतील. तर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुइयाँ यांच्या पीठाने सांगितले की, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला काही पावलं उचलावी लागतील. अन्यथा ते दिल्ली काय येतील. तुम्ही येथून मंत्र्यांना पाठवत आहात. मात्र त्यांचा हेतू चांगला असला तरी विश्वासाची कमतरता आहे.  

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितलं की, एका आठवड्याच्या आत योग्या आदेश घेतले जावेत. तोपर्यंत शंभू बॉर्डरवर परिस्थित चिघळण्यापासून रोखण्यासाठी सर्व पक्षांनी जैसे थे परिस्थिती कायम ठेवावी. दरम्यान, शंभू बॉर्डर येथे शेतकरी १३ फेब्रुवारीपासून तळ ठोकून आहेत. काही दिवसांपूर्वी शंभू बॉर्डर खुली करण्याचे आदेश पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने दिले होते. मात्र या आदेशांना हरयाणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHaryanaहरयाणा