शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 07:07 IST2021-04-03T07:06:17+5:302021-04-03T07:07:06+5:30
शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेक झाली तेव्हा टिकैत आपल्या कारमध्ये नव्हते. तथापि, दगडफेकीत त्यांच्या कारच्या मागची काच फुटली.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक
जयपूर : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेक झाली तेव्हा टिकैत आपल्या कारमध्ये नव्हते. तथापि, दगडफेकीत त्यांच्या कारच्या मागची काच फुटली. टिकैत यांचा वाहन ताफा तातरपूर चौक येथे पोहोचताच दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी विद्यार्थी नेत्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
राकेश टिकैत हे शुक्रवारी राजस्थानच्या अल्वर जिल्ह्याच्या ठिकाणी दोन सभा घेण्यासाठी जात होते. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, असे भिवाडचे पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांनी सांगितले. अल्वर येथील विद्यार्थी नेते कुलदीप राव आणि त्यांच्या समर्थकांनी ताफ्याला काळे झेंडे दाखविल्याने ताफ्यातील काही वाहने थांबवली. या वाहनांत बसलेल्या लोकांचा काळे झेंडे दाखविणाऱ्यांशी यावरून वाद झाला. टिकैत यांच्यासोबत असलेले भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष राजाराम मील यांनी सांगितले की, ४०-५० लोकांचा समूह होता. त्यांच्याकडे लाठ्या होत्या.