शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:16 IST

Crime News: देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला गुप्तचर यंत्रणांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ज्योतीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मागच्या काही काळापासून कमालीचा वाढलेला आहे. अशा परिस्थितीत देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला गुप्तचर यंत्रणांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ज्योतीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर असलेल्या ज्योती मल्होत्रा हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ज्योती ‘ट्रॅव्हल विथ ज्यो’ नावाचा युट्युब चॅनेल चालवते. ती पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली असताना ती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या संपर्कात आली. या प्रकरणात आतापर्यंत पंजाब आणि हरयाणाच्या विविध भागात राहणाऱ्या एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त करून २०२३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. या दरम्यान, तिची भेट पाकिस्तानच्या उच्चायोगातील कर्मचारी एसहास-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्यातील संबंध अधिकच घनिष्ट होत गेले. दानिशच्या माध्यमातून ज्योती हिची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांमधील इतर एजंट्ससोबत झाली. ज्यामध्ये अली अहसान आणि शाकिर ऊर्फ राणा शहबाज यांचाही समावेश होता. ज्योती या एजंट्ससोबत व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारथ्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्कात राहायची. ती पाकिस्तानबाबत सोशल मीडियावरून सकारात्मक माहिती शेअर करायची, सोबतच तिने काही संवेदनशील माहितीसुद्धा पाकिस्तानी एजंट्सना दिली.

एवढंच नाही तर ज्योती एका पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सच्या प्रेमातपडली होती. तसेच त्याच्यासोबत हल्लीच इंडोनेशियातील बाली येथे जाऊन आली होती. ज्योती मल्होत्रा हिच्या सोशल मीडियावर असलेल्या प्रभावाचा वापर पाकिस्तान भारतविरोधी प्रचार आणि गुप्तचर कारवायांसाठी करत होता, हेही आता समोर आले आहे.     

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPakistanपाकिस्तान