शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 09:56 IST

Fali S. Nariman Passed Away : देशातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फली. एस. नरिमन यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. 

देशातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फली. एस. नरिमन यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. फली एस. नरिमन यांनी नोव्हेंबर १९५० मध्ये मुंबई हायकोर्टामधून वकिलीला सुरुवात केली होती. तसेच १९६१ मध्ये त्यांना वरिष्ठ वकिल म्हणून नामांकित करण्यात आले होते. त्यांनी ७० पेक्षा अधिक वर्षे वकिली केली. सुरुवातीला मुंबई हायकोर्टात आणि नंतर १९७२ पासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली. 

भारताची राज्यघटना आणि न्याय व्यवस्तेवर असलेली त्यांची पकड पाहता १९७५ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्याच वर्षी जून महिन्यात पंतप्रधान इंदिर गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आणीबाणी लागू केली. त्यामुळे या आणीबाणीविरोधात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

फली एस. नरिमन यांना १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांची कायद्यावर पकड होती. त्यासोबतच ते एक उत्तम लेखक होते. त्यांनी द स्टेट ऑफ नेशन, गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट या पुस्तकांसह बिफोर मेमोरी या आत्मचरित्राचं लेखन केलं होतं.  

टॅग्स :IndiaभारतCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय