शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षांच्या संसारानंतर प्रख्यात उद्योगपती झाले पत्नीपासून वेगळे, म्हणाले, ही दिवाळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 16:14 IST

Gautam Singhania : प्रख्यात उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. आज एका पत्रकाच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया साइट एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

प्रख्यात उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. आज एका पत्रकाच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया साइट एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी माझ्यासाठी ही दिवाळी आधीसारखी राहणार नाही, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी एक्सवर व्यक्त केली आहे.

रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी लिहिले की, ही दिवाळी आधीच्यांसारखी असणार नाही. पती-पत्नी म्हणून आम्ही ३२ वर्षे एकत्र राहिलो. आई-वडील म्हणून पुढे गेलो. नेहमी एकमेकांसाठी उर्जेचा स्रोत बनलो.  आम्ही कटिबद्धता, संकल्प आणि विश्वासासह प्रवास केला. आमच्या जीवनात अपत्यांच्या रूपात दोन सर्वात सुंदर भाग आले.

त्यांनी पुढे लिहिलं की, नवाज आणि मी इथून पुढे वेगवेगळ्या वाटेने जाणार आहोत. मी त्यांच्यापासून विभक्त होतोय. मात्र आमचे दोन अनमोल हिरे असलेल्या निहारिका आणि निसासाठी जे काही सर्वात चांगलं असेल ते आम्ही करत राहू. आमच्या कुटुंबाच्या आसपास खूप अफवा आणि चर्चा सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमधून दावा करण्यात आला होता की, गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांना गेल्या आठवड्यात ठाणे येथे गौतम सिंघानिया यांच्या दिवाळी पार्टीमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. नवाज मोदी सिंघानिया यांना पार्टीत जाण्यापासून रोखतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर नवाज मोदी सिंघानिया यांनी आपल्याला पार्टीला निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र पार्टीच्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली, असा आरोप केला होता.  

टॅग्स :RaymondरेमंडFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिप