हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब अडचणीत सापडले आहेत.त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. संभल पोलिसांनी आतापर्यंत जावेद हबीब, त्यांचा मुलगा अनस हबीब आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध २० एफआयआर नोंदवले आहेत. त्यांनी १०० हून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिस पथके आता दिल्ली आणि मुंबईतील ठिकाणांवर छापे टाकण्याच्या तयारीत आहेत, तर कुटुंबाविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिस तपासानुसार, हे संपूर्ण प्रकरण दोन वर्षांपूर्वीचे आहे. २०२३ मध्ये, संभळच्या सरायट्रेन परिसरातील रॉयल पॅलेस वेंकट हॉलमध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम FLC या नावाने आयोजित करण्यात आला होता. जावेद हबीब स्वतः आणि त्यांचा मुलगा अनस हबीब हे स्टेजवर उपस्थित होते. हबीबने सुमारे १५० उपस्थितांना आश्वासन दिले की जर त्यांनी त्यांच्या FLC कंपनीत गुंतवणूक केली तर त्यांना ५० ते ७५ टक्के परतावा मिळेल. त्यांनी अनेकांना आमिष दाखवले. १०० हून अधिक लोकांनी FLC मध्ये ५ ते ७ लाख रुपये जमा केले. ही गुंतवणूक Binance Coin आणि Bitcoin च्या नावाने करण्यात आली होती, पण काही महिन्यांतच कंपनी गायब झाली.
गुंतवणूकदारांचे लाखोंचे नुकसान
एक वर्ष उलटले, पण गुंतवणूकदारांना कोणताही नफा मिळाला नाही. लोक वारंवार कंपनीच्या कार्यालयात आणि हबीब सलूनला भेट देत होते. गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा कंपनीचे स्थानिक प्रभारी सैफुल्लाह त्यांना टाळू लागले. काही दिवसांतच कंपनी बंद पडली आणि जावेद हबीब त्याच्या कुटुंबासह पळून गेला. त्याच्या नावावर नोंदणीकृत असलेले संभळ येथील कार्यालय आता बंद आहे.
सुरुवातीला काही पीडितांनी रायसत्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हिलाल, रेहान, अमन, माजिद हुसेन आणि मोहम्मद नईम नावाच्या गुंतवणूकदारांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे की, जावेद हबीबने जागतिक केस उद्योगात परिवर्तन घडवून आणण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपयांची फसवणूक केली. सुरुवातीच्या तक्रारीनंतर, पोलिस अधीक्षक (एसपी) के.के. बिश्नोई यांनी स्वतः रायसत्ती पोलिस ठाण्याला भेट दिली आणि पीडितांची भेट घेतली. त्यांनी त्यांना आश्वासन दिले की त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यानंतर, पोलिसांनी तपास वाढवला आणि असे दिसून आले की फसवणुकीचे किमान १०० बळी होते. तक्रारींची संख्या वाढली आणि १९ नवीन गुन्हे दाखल करण्यात आले. आजपर्यंत, जावेद हबीब, त्यांचा मुलगा अनस हबीब, त्यांची पत्नी आणि कंपनी प्रमुख सैफुल्ला यांच्याविरुद्ध एकूण २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Web Summary : Celebrity hairstylist Jawed Habib faces 20 FIRs for allegedly defrauding over 100 investors of crores through his FLC company with promises of high returns on Binance Coin and Bitcoin investments. Police are preparing raids and lookout notices.
Web Summary : मशहूर हेयर स्टाइलिस्ट जावेद हबीब पर उनकी एफएलसी कंपनी के माध्यम से 100 से अधिक निवेशकों को करोड़ों की धोखाधड़ी करने का आरोप है, जिसमें बिनेंस कॉइन और बिटकॉइन निवेश पर उच्च रिटर्न का वादा किया गया था। पुलिस छापेमारी और लुकआउट नोटिस की तैयारी कर रही है।