शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दररोज 100km सायकल चालवणारे फिटनेस आयकॉन अनिल कडसूर यांचे Heart Attack ने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 21:04 IST

45 वर्षीय अनिल कडसूनर यांनी दररोज 100km सायलक चालवण्याचा अनोखा विक्रम केला होता.

फिटनेस आयकॉन आणि बंगळुरुतील प्रसिद्ध सायकलपटू अनिल कदासूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 45 वर्षीय कडसूर यांनी सलग 42 महिने दररोज 100 किलोमीटर सायकलिंग करण्याचा विक्रम केला होता. 31 जानेवारी रोजी अनिल यांनी सोशल मीडियावर हा अनोखा विक्रम पूर्ण केल्याची माहिती दिली होती. त्याच रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले.

2.25 लाख किलोमीटरहून अधिक सायकल चालवलीसायकल चालवण्याचा एक दशकाहून अधिक अनुभव असलेल्या कदासूर यांनी 2.25 लाख किलोमीटरहून अधिक सायकल चालवली आहे. त्यांचा हा अनोखा विक्रम अनेक सायकलस्वारांसाठी मोठी प्रेरणा आहे. त्यांच्याशी फक्त हस्तांदोलन करणे म्हणजे अनेक लोकांसाठी ऊर्जा आणि सकारात्मकता मिळवण्यासारखे होते. त्यांच्या अशा अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

रोज 100 किमी सायकल चालवण्याचा छंदअनिल कडसूर अतिशय नम्र स्वभावाचे होते. ते नेहमी नवीन सायकलस्वारांना प्रोत्साहन आणि सल्लेही द्यायचे. जवळचे लोक त्यांना 'द्रोणाचार्य' म्हणत. विशेष म्हणजे, ते दररोज 100 किलोमीटर सायकल चालवायचे. हीच त्यांची खास ओळख होती. ऑगस्ट 2022 मध्ये एका सायकलिंग क्लबने त्यांना सलग 10 दिवस 100 किलोमीटर सायकल चालवण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान तर त्यांनी पूर्ण केलेच, पण यानंत त्यांना दररोज 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा छंद जडला. आता त्यांच्या अकाली जाण्याने कडसूर यांची सायलक थांबली...

टॅग्स :Cyclingसायकलिंगbangalore-north-pcबंगलोर उत्तरBengaluruबेंगळूरDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटका