शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:38 IST

"जर आपली लग्न करण्याची इच्छा नसेल, तर ठीक आहे. आपण संन्यासी होऊ शकतो. मात्र, आपण तेही होणार नसला तर, जबाबदारी घेणार नसाल, तर कसे चालेल?"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिव्ह-इन रिलेशनशिप, लग्नाचे वय तसेच, देशाच्या लोकसंख्या धोरणासंदर्भात मोठे आणि महत्वाचे विधान केले आहे. "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नाही, तर ते समाजाचे एक महत्त्वाचे युनिट आहे. जर तुम्ही जबाबदारी घेण्यास तयार नसाल, तर ते योग्य नाही," अशा शब्दांत भागवत यांनी लिव्ह-इन संस्कृतीसंदर्भात भाष्य केले. 

भागवत म्हणाले, कुटंबच आपल्याला समाजात कसे रहावे, हे शिकवते. हे सर्व आपला देश, समाज आणि धार्मिक परंपरा टिकवून ठेवण्याचे साधन आहे. जर आपली लग्न करण्याची इच्छा नसेल, तर ठीक आहे. आपण संन्यासी होऊ शकतो. मात्र, आपण तेही होणार नसला तर, जबाबदारी घेणार नसाल, तर कसे चालेल?"

तीन मुले असल्यास... -भागवत पुढे म्हणाले,  मी डॉक्टर वैगेरे मंडळींशी चर्चा करून काही माहिती घेतली. जर लग्न १९ ते २५ वर्षांदरम्यान झाले आणि दाम्पत्याला तीन मुले असतील, तर माता-पिता आणि मुलांचे आरोग्य उत्तम राहते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनानुसार, तीन मुले असल्यास मुलांमध्ये अहंकार व्यवस्थापन (Ego Management) विकसित होण्यास मदत होते. लोकसंख्याशास्त्राचा दाखला देत ते म्हणाले की, जर जन्मदर २.१ च्या खाली गेला तर तो समाजासाठी धोकादायक ठरतो. सध्या बिहारमुळे आपला दर २.१ वर असून अन्य राज्यांत तो १.९ पर्यंत खाली आला आहे.

५० वर्षांच्या नियोजनाची गरज -लोकसंख्या हे केवळ ओझे नसून ती एक प्रकारची संपत्तीही आहे. प्रभावी लोकसंख्या धोरण बनवणे आवश्यक आहे. देशाचे पर्यावरण, पायाभूत सुविधा, महिलांचे आरोग्य आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पुढील ५० वर्षांच्या अंदाजावर आधारित सर्वसमावेशक धोरण आखले जायला हवे. "मी स्वतः अविवाहित प्रचारक असल्याने मला यातील तांत्रिक माहिती नाही, मात्र तज्ज्ञांकडून मिळालेली ही माहिती समाजाच्या हितासाठी महत्त्वाची आहे," असेही भागवत यांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Family, marriage not just physical satisfaction: Mohan Bhagwat on live-in relationships

Web Summary : Mohan Bhagwat emphasizes family and marriage as vital societal units, not mere physical satisfaction. He advocates responsible family planning, highlighting the importance of marriage between 19-25 years for healthier families and a balanced population for societal well-being. Comprehensive policies for the next 50 years are necessary.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघmarriageलग्न