कुजबूज - साहेबांनी सांगितले.

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:36+5:302015-08-19T22:27:36+5:30

साहेबांनी सांगितले..

False - Saheb said. | कुजबूज - साहेबांनी सांगितले.

कुजबूज - साहेबांनी सांगितले.

हेबांनी सांगितले..
वाहतूक खात्यात भ्रष्टाचार चालू असल्याचे जगजाहीर आहेच. कित्येकांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यात महिला कर्मचार्‍याही मागे नसल्याचे म्हापसा येथे घडलेल्या एका प्रकरणावरून दिसून आले आहे. हा भ्रष्टाचार कोणत्या एकाच कार्यालयात चालतो अशातला प्रकार नाही. सरकारी कार्यालयातील वाहतूक कार्यालयात भ्रष्टाचार चालूच आहे. प्रत्येक कार्यालयात पैसे वसुलीसाठी एक-दोन कनिष्ठ कर्मचार्‍यांना हे काम देण्यात येते. हे कनिष्ठ कर्मचारी कामासाठी येणार्‍या ग्राहकांशी हळूच कुजबूज करतात. त्यांची कागदपत्रे एका टेबलावरून दुसर्‍या टेबलावर व तेथून वाहतूक निरीक्षक, साहाय्यक संचालकांपर्यंत नेवून शक्यतो लवकर स?ा घेण्याचे काम करीत असतात. काम झाले की पैसे घेतले जात नाहीत. तर हे कर्मचारी कामासाठी येणार्‍याला अगोदरच अमुक पैसे पडणार, असे सांगून त्यांच्याकडून आगावू पैसे घेतात. वाहनांची तपासणी करण्यासाठी कर्मशियल वाहनमालकांचे पासिंग झाल्यावर सर्व कागदपत्रे तपासली जातात. ती मालकाला देण्यात येतात. मात्र, पासिंग सर्टिफिकेट न देता ती या कर्मचार्‍याकडून घेण्यास सांगितले जाते. नंतर ते कनिष्ठ कर्मचारी ‘फिटनेस’ घेऊन बाहेर येतो व मालकाकडे सोपवितो. मात्र, ‘सायबान इतले घेवपाक सांगला’ असे सांगून आकडा सांगून त्याच्याकडून ते मिळाल्यावर त्याच्या हातात फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते.

भाजपासाठी सोयीस्कर प्रभागांची रचना
पालिकांच्या निवडणुका ऐन तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सध्या भाजपाच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुक आमदार नीलेश काब्राल यांच्या मागे मागे फिरताना दिसत आहेत. कुडचडे-काकोडा पालिकेत सध्या 12 प्रभाग आहेत. आणखी दोन प्रभाग वाढविण्यास मान्यता मिळालेली असली तरी भाजपाला आणखी एक प्रभाग वाढवून पंधरा प्रभाग हवे आहेत. ते होतील व त्यात भाजपाच्या सर्मथकांची वर्णी लागेलही. मात्र, सध्या भाजपाविरोधात वावरत असलेल्या नगरसेवकांचे प्रभाग फोडून ते तीन नवे प्रभाग करण्याची जोरदार तयारी चाललेली आहे. विरोधी नगरसेवकांना मिळण्याची शक्यता असलेले परिसर फोडून ते भाजपाचे सर्मथक असलेल्या भागात सामावून त्या ठिकाणी भाजपा सर्मथक मतदारांचा समावेश करून भाजपाला सर्मथन मिळेल अशा प्रकारे प्रभागांची फेररचना करण्याची तयारी सध्या सोयीस्करपणे चाललेली आहे. कुडचडे-काकोडा पालिकेवर भगवा फडकवण्याची ही जय्यत तयारी आहे. मात्र, मतदार कोणाला कसा कौल देतात ते निवडणुकीत दिसून येईल.

Web Title: False - Saheb said.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.