शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदार ओळखपत्रांवरून कर्नाटकात रणकंदन, कडक कारवाईचे निवडणूक आयोगाचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 02:23 IST

मंगळवारी रात्री बनावट मतदार ओळखपत्रांवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कर्नाटमध्ये एका फ्लॅटमधून 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. 

बंगळूरू -  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानास आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जोर लावला असून, सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री बनावट मतदार ओळखपत्रांवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कर्नाटमध्ये एका फ्लॅटमधून 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.  कर्नाटमध्ये 9 हजार 746 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली असून, ही ओळखपत्रे बनवण्यामागे  आर. आर. नगर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार मुनीरत्ना नायडू यांचा हात असल्याचा आरोप भाजपा नेते सदानंद गौडा यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून भाजपा नाटक करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. तसेच ज्या फ्लॅटमधून ही ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तो फ्लॅट मंजुळा नांजामुरी यांच्या नावे असून, त्या भाजपाच्या नेत्या असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र भाजपाने तातडीने हा आरोप फेटाळून मंजुळा नांजमुरी यांनी सहा वर्षांपूर्वीच भाजपा सोडल्याचा दावा प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. 

या प्रकाराविषयी मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार म्हणाले, "फ्लॅटमधून जप्त करण्यात आलेली 9 हजार 746  मतदार ओळखपत्रे पहिल्या नजरेत खरी वाटत आहेत. ही ओळखपत्रे एका छोट्या पाकीटात ठेवण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर नाव पत्ता लिहिलेला आहे. या प्रकरणी दोषींवर योग्यवेळी योग्य कारवाई केली जाईल. बंगळुरूचे आयुक्त आणि अन्य तीन निरीक्षकांना तपासासाठी पाठवण्यात आले आहे. येत्या 24 तासात या प्रकाराविषयीचे सत्य समोर येईल त्याआधारे आम्ही योग्य निर्णय घेऊ."  

 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस