बनावट चावीने दागिने पळविले
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:40+5:302015-01-30T21:11:40+5:30
बनावट चावीने दागिने पळविले

बनावट चावीने दागिने पळविले
ब ावट चावीने दागिने पळविलेनागपूर : बनावट चावी वापरून २.३६ लाखाचा मुद्देमाल पळविल्याची घटना कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी सायंकाळी ७.३० ते ८.४५ वाजताच्या दरम्यान घडली. अमोल भास्करराव आरमोरकर (३४) रा. दक्षिणामूर्ती चौक, प्रवीण पटलेच्या घराजवळ हे आपले अनमोल ज्वेलर्सचे दुकान बंद करून सोन्याचांदीचे दागिने, रोख ५६ हजार असा एकूण २.३६ लाखाच्या मुद्देमालाची हँडबॅग आपल्या ॲक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३१, बीएस-२५७८ च्या डिक्कीत ठेवून घरी परतत होते. पंचवटी मोठा ताजबाग, सक्करदरा ते दक्षिणामूर्ती महाल दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांची नजर चुकवून बनावट चावीने डिक्की उघडून त्यातील मुद्देमाल लंपास केला. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी).............