शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

राम मंदिरासाठी VHP ठोठावणार खासदारांचे दार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 5:27 PM

 विश्व हिंदू परिषदेचे नेते अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी देशातल्या 543 खासदारांची भेट घेणार आहेत.

नवी दिल्ली-  विश्व हिंदू परिषदेचे नेते अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी देशातल्या 543 खासदारांची भेट घेणार आहेत. यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी काही काळही निश्चित केला आहे. 25 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान या खासदारांच्या भेटीगाठी घेण्यात येणार आहेत. सर्व खासदारांच्या भेटी घेऊन विहिंप राम मंदिराच्या निर्माणासाठी कायदा करण्याची मागणी करणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात खासदारांनी राम मंदिराचा कायदा बनवण्यासाठी समर्थन द्यावं, अशी विहिंपला आशा आहे.11 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात प्रमुख मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिराच्या निर्माणासाठई अध्यादेश आणून कायदा बनवण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषदे(विहिंप)सह अनेक संघटना राम मंदिराच्या निर्माणासाठी रॅली काढणार आहेत.हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच रामलीला मैदानात 9 डिसेंबर रोजी एक विशाल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये आठ लाख लोक सहभागी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ज्यात मोठ्या संख्येनं साधू-संतांचा सहभाग असेल. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये आरएसएसचे मोठे नेते सहभागी होणार आहेत.