पर्वरीत भरवस्तीत दुकान फोडले अन्य पाच दुकानांतही चोरीचा अयशस्वी प्रयत्न
By Admin | Updated: September 8, 2015 02:08 IST2015-09-08T02:08:40+5:302015-09-08T02:08:40+5:30
पर्वरी : येथील पीडीए कॉलनी आणि नोवा सिदाद येथील एकूण सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. पीडीए कॉलनीतील व्हील प्लानेट या दुकानाच्या शटरचे टाळे तोडून चोरट्यांनी आतील गल्ल्यातील सुमारे पंचावन्न हजार रुपये लंपास केले.

पर्वरीत भरवस्तीत दुकान फोडले अन्य पाच दुकानांतही चोरीचा अयशस्वी प्रयत्न
प ्वरी : येथील पीडीए कॉलनी आणि नोवा सिदाद येथील एकूण सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला. पीडीए कॉलनीतील व्हील प्लानेट या दुकानाच्या शटरचे टाळे तोडून चोरट्यांनी आतील गल्ल्यातील सुमारे पंचावन्न हजार रुपये लंपास केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.7) पहाटे 4 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान पीडीए कॉलनीतील व्हील प्लानेट या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील पंचावन्न हजारांची रक्कम लांबविल्याची तक्रार दुकानाचे मालक देसाई यांनी पर्वरी पोलीस स्थानकात नोंदविली. उपनिरीक्षक महेश नाईक यांनी पंचनामा केला आणि अज्ञाताविरुद्ध भा.दं.सं. 454, 457 आणि 380 कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे. निरीक्षक ब्रेंडन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत. घटनास्थळी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.