शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

Fact Check : बापरे! कोरोनाची तिसरी लाट येणार, 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन होणार?; जाणून घ्या त्यामागचं नेमकं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 22:27 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागून करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवरच सध्या पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 48,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल तीन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत असून ज्यामध्ये देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्य़ा काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. मात्र काही ठिकाणी वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवरच सध्या पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचे अनेक मेसेजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका न्यूज चॅनलचा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे 1 जुलै ते 31 जुलै कडक लॉकडाऊन असंही यात लिहिण्यात आलं आहे.

प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) लॉकडाऊनबाबत व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. त्यामुळेच 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू होत असल्याचं वृत्त खोटं असल्याचं आता समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

भीषण, भयंकर, भयावह! जगभरात Delta व्हेरिएंटचा हाहाकार; भारत, अमेरिका, ब्रिटनसह 100 देशांमध्ये प्रसार

भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोकादायक असलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये भारतात आढळून आला आहे. मात्र आता जवळपास 100 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. मूळ कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हेरिएंट अडीचपटीने अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे. 78 देशांच्या GISAID आकड्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, भारत, रशिया, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासह इतर देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आपली पकड अधिक मजबूत करत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत