शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

नेहरुंमुळे कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; जाणून घ्या मोदींचा दावा खरा की खोटा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 1:10 PM

नेहरुंमुळे हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेल्याचा मोदींचा दावा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणांमधून अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 1954 मध्ये कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीला माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना जबाबदार धरलं. उत्तर प्रदेशातल्या कौशांबीत एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला. व्यवस्थापनातील त्रुटींमुळे त्यावेळी हजारो लोकांचे प्राण गेले. मात्र कोणालाही एका रुपयाचीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. उलट याबद्दलच्या बातम्या काँग्रेसकडून दाबण्यात आल्या, असा दावा करत मोदींनी नेहरुंवर शरसंधान साधलं. पंतप्रधान मोदींच्या आरोपांनंतर खरंच त्या घटनेला नेहरु जबाबदार होते का, त्यावेळी काँग्रेसनं ही बातमी दाबली होती का, असे सवाल उपस्थित झाले. 1954 मध्ये भारतात टीव्ही नव्हते. त्यामुळे लोक माहितीसाठी वर्तमानपत्रांवर आणि रेडिओवर अवलंबून होते. काही वरिष्ठ पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, त्या चेंगराचेंगरीसाठी नेहरुंना जबाबदार धरता येणार नाही. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पत्रकारांनी दोन गोष्टींकडे लक्ष वेधलं. ज्या दिवशी चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी नेहरु तिथे उपस्थितच नव्हते. याशिवाय त्या काळी आजच्या सारखं तंत्रज्ञान नसल्यानं गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण होतं. 

चेंगराचेंगरीला नेहरु जबाबदार?वरिष्ठ पत्रकार पीयूष बबेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यात 3 फेब्रुवारी 1954 रोजी चेंगराचेंगरी झाली. पंडित नेहरु या दिवशी कुंभमेळ्याला आले नव्हते. ते 2 फेब्रुवारीला कुंभमेळ्यात स्नान करुन परतले होते. त्यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर ते पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पीयूष बबेले यांनी नेहरु वाड्मयाच्या 25 व्या खंडाचा आणि नेहरुंच्या संसदेतल्या भाषणाचा संदर्भ दिला. चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी नेहरुंनी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी मृतांबद्दल संवेदना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलं होतं. प्रयागराजमधले वरिष्ठ पत्रकार नरेश मिश्र यांनीदेखील नेहरु चेंगराचेंगरीच्या दिवशी नव्हे, तर त्याच्या एक दिवस आधी कुंभमेळ्यात सहभागी झाल्याचं सांगितलं. 3 फेब्रुवारीला राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद कुंभमेळ्याला उपस्थित होते. ते किल्ल्याच्या बुरुजावरुन कुंभमेळा पाहत असताना संन्याशांचा मोठा जमाव तिथे आला. त्याचवेळी दोन पेशवाई मिरवणुका तिथून जाऊ लागल्या आणि चेंगराचेंगरी झाली, असं मिश्र म्हणाले.काँग्रेसनं बातमी दाबली?कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीचे साक्षीदार असलेल्या नरेश मिश्र यांनी तिथल्या भीतीदायक परिस्थितीचं वर्णन केलं. 'जवळपास 45 मिनिटं चेंगराचेंगरी सुरू होती. परिस्थितीवर कोणाचंच नियंत्रण नव्हतं. 45 मिनिटांनंतर परिस्थिती निवळली. मात्र तोपर्यंत 700-800 जणांचा मृत्यू झाला होता. हा आकडा सरकारी होता. त्यामुळे खरा आकडा हजारपेक्षा अधिक असण्याची शक्यता असू शकेल,' असं मिश्र यांनी सांगितलं. पुढील अनेक महिने या चेंगराचेंगरीची चर्चा झाली आणि त्यावेळच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.   

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूNarendra Modiनरेंद्र मोदीKumbh Melaकुंभ मेळा