शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

Fact Check: ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नसल्यास नेब्युलायझरचा वापर होऊ शकतो? जाणून घ्या सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 12:22 IST

oxygen cylinder : कोरोना रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा कमी पडत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देहा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांनी नेब्युलायझर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे २७६७ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, कोरोना रुग्णांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा कमी पडत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Fact Check: Can nebulizer be used if oxygen cylinder is not available? Know the truth ...)

अशा परिस्थितीत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये कोरोना रूग्णांना ऑक्सिजनऐवजी नेब्युलायझर मशीन वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांनी नेब्युलायझर आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये स्वत: ला सर्वोदय रुग्णालयाचे डॉक्टर आलोक असल्याचे सांगणारा व्यक्ती कोरोना रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऑक्सिजनऐवजी नेब्युलायझर मशीन वापरण्याचा सल्ला देत आहेत. या व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की, वातावरणात पुरेसा ऑक्सिजन आहे, जो नेब्युलायझर  मशीनच्या सहाय्याने घेतला जाऊ शकतो.

(CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासांत ३,४९,६९१ नवे रुग्ण, २७६७ जणांचा मृत्यू )

दरम्यान, ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी नेब्युलायझरविषयी ज्या प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, याबद्दल ट्विट करुन सर्वोदय रुग्णालयाने हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नकली असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयाच्यावतीने असे सांगितले गेले की, हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारच्या वैज्ञानिक अभ्यासावर आधारित नाही. 

याचबरोबर, सर्वोदय रुग्णालयाने अशा प्रकराचा कोणताही दावा पूर्णपणे फेटाळला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारचा प्रयोग करू नका, हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असेही असे सर्वोदय रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

(Delhi Lockdown : दिल्लीत कोरोनाचे संकट वाढले, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शक्यता)

डॉ.आलोक यांच्याकडून स्पष्टीकरणसोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून सर्वोदय रुग्णालयाने डॉ. आलोक यांच्याकडे जाब विचारला असता त्यांनी आपल्याकडून चुकीचा मेसेज गेल्याचे स्पष्टीकरण दिले. ऑक्सिजन सिलिंडरऐवजी नेब्युलायझर मशीन वापरणे चुकीचे आहे. हा योग्य पर्याय नाही, असे डॉ. आलोक यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलSocial Viralसोशल व्हायरल