सरकारच्या धोरणांवर फेसबुकवर टीकात्मक पोस्ट, 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांचा तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 10:15 PM2017-10-11T22:15:31+5:302017-10-11T22:16:07+5:30

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. झाकीर अली त्यागी असे या या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

Facebook posted a commentary on government policies, 42-year prison term for the 18-year-old | सरकारच्या धोरणांवर फेसबुकवर टीकात्मक पोस्ट, 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांचा तुरुंगवास

सरकारच्या धोरणांवर फेसबुकवर टीकात्मक पोस्ट, 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांचा तुरुंगवास

Next

नवी दिल्ली -  सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. झाकीर अली त्यागी असे या या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे.  उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये हा प्रकार घडला. झाकीर अली त्यागीनं एका फेसबुक पोस्टमध्ये या तरुणाने सरकारच्या धोरणांवर टीकात्मक लिखाण केलं होतं. त्यामुळे त्याला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. यावेळी त्याला सराईत गुन्हागारांसोबत राहावे लागले. इतकेच नाही तर स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पोलिसांना लाचही द्यावी लागल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

2 एप्रिलच्या रात्री पोलिसांनी त्याला फेसबुकवर पोस्ट लिहिल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर भांदवि 420 अन्वये फसवणुकीचा तसेच आयटी अॅक्ट कलम 66 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला होता. त्यानतंर 42 दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र, यावेळी पोलिसांनी आरोपपत्रात त्याच्यावर कलम 124 ए अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याची खळबळजनक माहिती त्यागीचे वकिल काझी अहमद यांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. एका स्टील फॅक्टरीमध्ये ट्रान्स्पोर्टर म्हणून काम करणाऱ्या झाकीरने सांगितले की, स्थानिक मदरशातून घरी परतत असताना चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी त्याला २ एप्रिलच्या रात्री ताब्यात घेतले. चौकशीनंतर काही वेळातच त्याला सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या झाकीरच्या एफआयआर कॉपीमध्ये त्याच्यावर फेसबुकवरील लिखाणाबाबत आरोप लावण्यात आल्याचे स्पष्ट होते. या आरोपपत्रानुसार, झाकीरने फेसबुकवर लिहिले होते की, गंगा नदीला आता सजिव असल्याचा दर्जा देण्यात आला आहे. जर एखादी व्यक्ती नदीत बुडून मृत पावली, तर गंगा नदीवर गुन्हा दाखल करणार का? त्याचबरोबर राम मंदिराबाबत त्याने लिहिले होते की, राम मंदिर निर्मितीचा वाद केवळ एक थट्टा आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये पुन्हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल. तसेच हज यात्रेसाठी एअर इंडियाला देण्यात आलेले अनुदान केंद्र सरकारने अद्याप का काढले नाही, याचे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे त्याने फेसबूकवरील पोस्टमध्ये लिहीले होते

Web Title: Facebook posted a commentary on government policies, 42-year prison term for the 18-year-old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.