शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकच्या अधिकाऱ्यांना आयटी समितीने हजर होण्यास सांगितले, सोमवारी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 12:06 IST

 या समितीने २०१९ मध्येच पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा आराखडा तयार केला आहे. गुगल, ॲमेझॉन यासारख्या कंपन्या डेटा स्टोअर करतात. या विधेयकामुळे अशा कृतीला प्रतिबंध बसेल.

नवी दिल्ली : फेसबुक चुकीची माहिती आणि द्वेष पसरवणाऱ्या बातम्या कशा प्रकारे हाताळते हे फेसबुक जागल्या (व्हीसलब्लोअर) सोफी झँग यांनी उघड केल्यानंतर आता हा विषय माहिती तंत्रज्ञान संसदीय समितीकडे पोहोचला आहे. चुकीची माहिती आणि द्वेष पसरवणाऱ्या बातम्यांचा परिणाम भारतात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर झाला होता हे विशेष.सोफी झँग या फेसबुकच्या माजी कर्मचारी आहेत. त्यांनी फेसबुकची कथित अनैतिक कामकाज पद्धत लोकांसमोर आणली होती. झँग यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर अध्यक्ष असलेल्या या समितीला वरील विषयाशी संबंधित कागदपत्रे दिली आहेत. २९ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या आपल्या बैठकीत फेसबुकच्या भारतीय अधिकाऱ्यांना समितीने आपल्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. झँग यांनी दिलेल्या कागदपत्रांवर या अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. समिती नागरिकांचे हक्क सुरक्षित राखणे आणि समाजमाध्यमे तसेच ऑनलाईन न्यूज मीडियाच्या गैरवापराला प्रतिबंध करण्याच्या विषयावर विशेषत: डिजिटल स्पेसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर भर देत अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन ऐकून घेईल.  समिती इलेक्ट्रॉनिक अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या प्रतिनिधिंचेही म्हणणे ऐकून घेईल.

सोशल मीडियाला वेसण घालणार; अधिवेशनात विधेयक --     फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियाचा गैरवापर थांबविण्यासाठी संसदेच्या समितीने एक नियामक संस्था स्थापन करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशी संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात येतील. याबाबतचे विधेयकही मांडण्यात येणार आहे. -     समितीचे प्रमुख भाजपचे मंत्री पी.पी. चौधरी यांनी सांगितले की, या विधेयकातील नियमांचे पालन न केल्यास सोशल मीडिया कंपनींच्या जागतिक कमाईच्या ४ टक्के दंड आकारण्यात येऊ शकतो.

-     या समितीने २०१९ मध्येच पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा आराखडा तयार केला आहे. गुगल, ॲमेझॉन यासारख्या कंपन्या डेटा स्टोअर करतात. या विधेयकामुळे अशा कृतीला प्रतिबंध बसेल.

-     समितीचे म्हणणे आहे की, देशातील प्रेसला ज्याप्रमाणे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया नियंत्रित करते त्याचप्रमाणे सोशल मीडियाप्लॅटफॉर्मसाठी एक नियामक संस्था असायला हवी, जेणेकरून सोशल मीडियावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल.  

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाCentral Governmentकेंद्र सरकार