व्हॉट्स अॅपवर येणार फेसबूक
By Admin | Updated: January 27, 2016 17:03 IST2016-01-27T16:40:32+5:302016-01-27T17:03:08+5:30
लोकप्रिय सोशल माध्यमातील दोन अॅप एकत्र जोडण्यात येणार आहेत. फेसबूक हे व्हॉट्स अॅपला जोडले जाणार असल्याचे समजते आहे

व्हॉट्स अॅपवर येणार फेसबूक
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - लोकप्रिय सोशल माध्यमातील दोन अॅप एकत्र जोडण्यात येणार आहेत. फेसबूक हे व्हॉट्स अॅपला जोडले जाणार असल्याचे समजते आहे. सोशल माध्यमातून साधला जाणारा संवाद अधिक चागंल्या पध्दतीने होण्यासाठी हा प्रयोग केला जात आहे.
व्हॉटस् अॅप ने दिलेल्या माहीतीनुसार सोशल माध्यमावरील संवाद अधिक सुरक्षित व कूटबद्धतेसह करण्यासाठी दोन्ही अॅप एकत्र जोडले जाणार आहे. अँड्राँइड विकासक जाव्हीयर सॅन्तोस यांनी त्यांच्या गुगल प्लसवर आगामी होणाऱ्या अॅप मधील बदलाचे काही स्क्रीनशॉट पोस्ट करत होणारे बदल दर्शवले आहेत. या पोस्टद्वारे असे जमजते की, सध्याचे २.१२.४१३ व्हर्जन असलेले अॅप भविष्यात गुगल प्ले वर २.१२.३६७ असे उपल्बद्ध होणार आहे.