महिला आघाडी अध्यक्षाची हकालपट्टी

By Admin | Updated: April 5, 2016 00:03 IST2016-04-05T00:03:02+5:302016-04-05T00:03:02+5:30

भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेश महिला आघाडीच्या प्रमुख मधु मिश्रा यांना त्यांनी अलिगडमध्ये केलेले वादग्रस्त वक्तव्य चांगलेच भोवले.

Extraction of Women's Chairperson | महिला आघाडी अध्यक्षाची हकालपट्टी

महिला आघाडी अध्यक्षाची हकालपट्टी

लखनौ : भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेश महिला आघाडीच्या प्रमुख मधु मिश्रा यांना त्यांनी अलिगडमध्ये केलेले वादग्रस्त वक्तव्य चांगलेच भोवले. प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी त्यांची सहा वर्षांकरिता पक्षातून हकालपट्टी केली आहे.
भाजप प्रवक्ता विजय बहादूर पाठक यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, वाजपेयी यांनी मिश्रा यांच्या वादग्रस्त विधानाची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना सहा वर्षांकरिता पक्षातून बडतर्फ केले आहे. मधु मिश्रा यांनी ब्राह्मण संमेलनात बोलताना आज जे लोक तुमच्या डोक्यावर बसून राज्य करीत आहेत ते एकेकाळी तुमची पादत्राणे साफ करीत होते. पण आमच्यात एकी नसल्याने ते सत्तेत आहेत, असे विधान केले होते.

Web Title: Extraction of Women's Chairperson