चौपदरीकरणाच्या टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन टळले
By admin | Updated: March 14, 2016 00:10 IST
नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्यांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. करोडो रुपयांची शेतजमीन व जीवंत विहिरी बचावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
चौपदरीकरणाच्या टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन टळले
नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत जिल्ात महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाच प्रक्रीया सुरू आहे. चौपदरीकरणाव्यतिरिक्त नशिराबाद येथे प्रास्तावित टोल नाक्यासाठी शेतकर्यांची होणारे अतिरिक्त भूसंपादन स्थानीक शेतकरी राजकीय पदाधिकार्यांच्या प्रयत्नांमुळे टळले आहे. करोडो रुपयांची शेतजमीन व जीवंत विहिरी बचावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान टोलनाक्यासाठीचे जास्तीचे१२६ मीटर रुंदीचे भूसंपादन न करता उपलब्ध ६० मीटर जागेतच झिकझॅक पद्धतीच्या टोलनाक्याची निर्मिती करण्यात यावी, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधकिरणाकडून भूसंपादन अधिकारी जळगाव यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.महामार्ग चौपदरीकरणा व्यतिरिक्त केवळ टोलनाक्यासाठी नशिराबादसह परिसरातील सुमारे २० एकर अतिरिक्त जमीनी संपादीत करण्याचा प्रयत्न महामार्गविभागाचा होता. त्यात करोडो रुपयांची शेतजमीनीसह सुमारे आठ जीवंत विहिरी नष्ट होणार होत्या. ही बाब माजी खासदार वाय.जी.महाजन, प्रगतीशील शेतकरी तथा भाजप शहराध्यक्ष लालचंद पाटील, गणपत सोमा पाटील, पराग रोटे, संजय चौधरी, दिलीप पाटील, सुपडू महाजन, अरुण नेमाडे, राजेंद्र पाचपांडे, भाजप पदाधिकार्यांसह शेकडो शेतकर्यांनी लक्षात घेता टोलनाक्यासाठीच्या अतिरिक्त भूसंपादनाला विरोध केला. यासंदर्भात पालकमंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए.टी.पाटील यांच्याकडे टोलनाक्याच्या अतिरिक्त भूसंपादनामुळे (कारण टोलनाका ठराविक काळानंतर संपुष्टात येतो व जमीन तशीच पडून राहिली असती) शेतकरी आयुष्यभर आर्थिक अडचणीत येणार होता. याबाबत त्यांना गार्हाणे मांडून निवेदन दिली. त्यांनी याबाबत सहानुभुतीपूर्वक पाठपुरावा करुन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शेतकरीवर्गाची कैफीयत सांगितली. मंत्री नितीन गडकरी याबाबत दखल घेत केवळ केवळ टोलनाक्यासाठी अतिरिक्त भूसंपादन न करण्याचे आदेश काढले आहे. आहे त्याच जागेत झिकझॅक पद्धतीने नवीन टोलनाका उभारावा असे सांगितले. त्यामुळे शेतजमिनी व विहीरी वाचल्याने शेतकरीवर्ग आनंद व्यक्त करीत आहे. भाजपच्या व शेतकर्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.