परराष्ट्रमंत्री बांगलादेश दौ:यावरून मायदेशी

By Admin | Updated: June 28, 2014 01:34 IST2014-06-28T01:34:32+5:302014-06-28T01:34:32+5:30

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आपल्या बांगलादेश दौ:यावरून शुक्रवारी मायदेशी परतल्या.

External Affairs Minister visits Bangladesh: From here on, Home | परराष्ट्रमंत्री बांगलादेश दौ:यावरून मायदेशी

परराष्ट्रमंत्री बांगलादेश दौ:यावरून मायदेशी

>ढाका : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आपल्या बांगलादेश दौ:यावरून शुक्रवारी मायदेशी परतल्या. स्वराज यांनी पदभार सांभाळल्यानंतर स्वतंत्रपणो केलेला हा पहिलाच विदेश दौरा उभय देशांतील मैत्री संबंध दृढ करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
‘आमच्या मते हा दौरा अत्यंत फलदायी आणि समाधानकारक ठरला,’ अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रलयाच्या प्रवक्त्याने येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मायदेशी रवाना होण्यापूर्वी दिली. परस्परांच्या चिंता दूर करून शेजारी देशांसोबत काम करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक चांगले पाऊल असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले.
तत्पूर्वी स्वराज यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीच्या प्रमुख खालिदा ङिाया यांची भेट घेतली. ङिाया यांनी गेल्या 5 जानेवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकत हसिना सरकारवर आरोप केला होता. ङिाया यांच्या आरोपांसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, बांगलादेशच्या अंतर्गत मुद्यांवर देशातील लोकांनीच तोडगा काढावा. 
स्वराज यांनी गुरुवारी बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल हामिद, पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली होती. या दौ:यात स्वराज यांनी तिस्ता पाणीवाटप तथा भूसीमा करार याबाबत बांगलादेशचे आक्षेप दूर करण्याची ग्वाही दिली. (वृत्तसंस्था) 
 
 
4दौ:याच्या दुस:या दिवशी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा ङिाया यांनी स्वराज यांना दोन जामदानी साडय़ा भेट दिल्या. दौ:याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान शेख हसीना आणि स्वराज यांच्यातही साडय़ांची देवाण-घेवाण झाली होती.
4शपथविधी सोहळ्य़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केले होते. मोदींनी नवाज शरीफ यांच्या आईसाठी एक शाल भेट दिल्यानंतर काही दिवसांनी शरीफ यांनी पंतप्रधानांच्या आईसाठी साडी भेट दिली होती.
 या पाश्र्वभूमीवर बांगलादेशातील या ‘साडी डिप्लोमसी’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.े 

Web Title: External Affairs Minister visits Bangladesh: From here on, Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.