शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रात्री एलईडीच्या संपर्कात राहिल्याने मधुमेहाचा धोका, तेजस्वी प्रकाश करतोय घात, हार्मोन्समध्ये होतोय बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 09:09 IST

Health News:

नवी दिल्ली : घरातील वापरापासून ते विद्युत रोषणाई आणि इतर अनेक ठिकाणी एलईडी लाइटचा वापर वाढला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी एलईडी लाइटसच्या संपर्कात आल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.चीनमधील शांघाय जिओटॉन्ग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना मधुमेहाचा वाढता धोका आणि रात्रीची लाइट यांच्यातील परस्परसंबंध आढळला आहे. त्यांना असे आढळले की रात्रीच्या प्रकाशाच्या तीव्र संपर्कामुळे मेलाटोनिन आणि कॉर्टिकोस्टेरॉन सारख्या हार्मोन्सच्या प्रोफाइलमध्ये बदल होऊ शकतो. 

शरीराचा असा उडतो गोंधळ- जेव्हा अंधार पडू लागतो, तेव्हा आपले मेलाटोनिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे आपल्याला झोप येते. तुमची साखरेची पातळी तुमच्या जागृत होण्याच्या संप्रेरकांसोबत वाढते.   - तेजस्वी दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी शरीरात मेलाटोनिन सोडायचे की दाबायचे याबद्दल गोंधळ होतो, असे डॉ. मोहन यांनी सांगितले. - मेलाटोनिनला दडपून टाकल्यामुळे शरीर जागृत आणि सतर्कतेच्या स्थितीत राहते. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता निर्माण होते आणि काउंटर रेग्युलेटरी हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे शरीरावर ताण येतो.

या कर्मचाऱ्यांना  धोका जास्तरात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना लाइटमध्ये काम करावे लागते. हा गट जीवनशैलीबाबत कमी शिस्तबद्ध असतो. त्यांना कमी झोप मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणा यांचा त्रास होऊ शकतो. मधुमेह आणि जुनाट आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी झोप महत्वाची आहे. उशिरा झोपणाऱ्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह