विदेशात काळा पैसा ठेवणारे उघड
By Admin | Updated: October 28, 2014 02:34 IST2014-10-28T02:34:35+5:302014-10-28T02:34:35+5:30
काळा पैसा परदेशातील बँकांमध्ये नेऊन ठेवल्याबद्दल ज्यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने खटले दाखल केले आहेत अशा आठ भारतीयांची नावे केंद्र सरकारने सोमवारी उघड केली.

विदेशात काळा पैसा ठेवणारे उघड
सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र : बर्मन, लोढय़ा व तिंबलो यांच्यासह आठ जणांची नावे जाहीर
नवी दिल्ली : भारतात कमावलेला काळा पैसा परदेशातील बँकांमध्ये नेऊन ठेवल्याबद्दल ज्यांच्याविरुद्ध प्राप्तिकर विभागाने खटले दाखल केले आहेत अशा आठ भारतीयांची नावे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात उघड केली. मात्र यात कोणाही राजकीय नेत्याच्या नावाचा समावेश नाही.
या नावांमध्ये डाबर इंडिया या औषधे व ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादक कंपनीचे एक प्रवर्तक प्रदीप बर्मन, राजकोट येथील सोने-चांदीचे घाऊक व्यापारी पंकज चिमणलाल लोढय़ा व राधा सतीश तिंबलो, चेतन सतीश तिंबलो, रोहन सतीश तिंबलो, अॅना चेतन तिंबलो व मल्लिका रोहन तिंबलो या गोव्यातील मे. तिंबलो प्रा. लि. या खाण कंपनीच्या पाच संचालकांचा समावेश आहे. परदेशी बँकेतील खाते तिंबलो कंपनीचे आहे की संचालकांचे, हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. प्रदीप बर्मन डाबर इंडिया कंपनी स्थापन करणा:या प्रवर्तक घराण्यातील असले तरी सध्या कंपनीत ते कोणत्याही पदावर नाहीत. पूर्वी ते कंपनीचे पूर्णवेळ संचालक होते. बर्मन यांचे नाव फ्रेंच सरकारकडून मिळाले आहे तर लोढय़ा व तिंबलो यांची नावे इतर देशांकडून प्राप्त झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
परदेशातील काळा पैसा देशात आणण्याच्या गप्पा सत्तेवर येण्यापूर्वी मारणारे सरकार आता स्वस्थ का बसले आहे, अशी जोरदार टीका सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी ही आठ नावे असलेले प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी दाखल केलेल्या काळ्या पैशासंबंधीच्या जनहित याचिकेच्या सुनावणीत हे प्रतिज्ञापत्र केले गेले. कदाचित उद्या मंगळवारी न्यायालय या नव्या प्रतिज्ञापत्रवर विचार करेल. प्राप्तिकर विभागाने ज्यांचा तपास केला आहे अशा काळ्या पैशाच्या प्रकरणांची माहिती भारताला देण्याची तयारी स्वित्ङरलडने दाखविली आहे, असेही प्रतिज्ञापत्रत म्हटले आहे.
प्रदीप बर्मन यांना अनिवासी भारतीयाचा दर्जा होता तेव्हा सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून हे खाते त्यांनी उघडलेले आहे. या खात्याची सर्व माहिती कायद्यानुसार त्यांनी स्वत:हून प्राप्तिकर खात्यास दिली असून, त्यावर जो काही लागू होता तो सर्व कर त्यांनी भरलेला आहे. परकीय बँकेत असलेले कायदेशीर खाते व बेकायदा खाते यात कोणताही फरक न करता परदेशी बँकेत खाते असणा:या सर्वानाच एका तागडीत तोलून मलिन केले जावे हे दुर्दैवी आहे. अत्यंत सचोटीने कंपनीचे व्यवस्थापन करण्यास बर्मन कुटुंब कटिबद्ध असून, सर्व पातळीवर त्यांच्याकडून नैतिक वर्तन, प्रोत्साहन दिले जाते, असे डाबर इंडिया लि.च्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
माङो स्विस बँकेत किंवा अन्य कोणत्याही परकीय बँकेत कोणतेही खाते नाही. खरेतर ही माहिती मला प्रसिद्धिमाध्यमांकडूनच मिळाली आणि धक्का बसला. मी माझी सर्व मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडे जाहीर केली असून, यापुढेही आम्ही सर्व प्रक्रियांचे पालन करून कर विभागाला सहकार्य देऊ, असे श्रीजी ग्रुपचे प्रमुख पंकज लोढय़ा यांनी सांगितले. तर प्रमुख तिंबलो प्रा.लि.चे प्रमुख राधा तिंबलो यांनी सरकारने केलेल्या प्रतिज्ञापत्रचा अभ्यास केल्यानंतरच बोलेन, असे म्हटले आहे.
डाबरच्या शेअरमध्ये 9 टक्के घसरण
काळ्या पैशांसंदर्भात जाहीर झालेल्या तीन नावांत डाबर कंपनीच्या प्रमोटरचे नाव उघड झाल्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या शेअरच्या मूल्यात 9 टक्क्यांर्पयत घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारात या समभागांत 9 टक्क्यांची घसरण होत या शेअरची किंमत 196.4क् रुपयांर्पयत खाली उतरली तर राष्ट्रीय शेअर बाजारातही 8.94 टक्क्यांची घसरण होत समभागाची किंमत 196.55 इतकी झाली. मात्र, दुपारनंतर पुन्हा गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर लावल्याने बाजार बंद होतेवेळी कंपनीचा शेअर 2क्7.8क् रुपयांवर स्थिरावला.
कोणाचेही नाव दडवून ठेवण्याचा इरादा नाही
काळा पैसा परदेशात दडवून ठेवणा:या कोणाचेही नाव दडवून ठेवण्याचा आपला कोणताही इरादा नाही, अशी खात्री देत सरकार प्रतिज्ञापत्रत म्हणते की, ज्या प्रकरणांमध्ये कर बुडविल्याचे सिद्ध होत असेल अशा सर्व प्रकरणांसंबंधी अन्य देशांकडून मिळणारी सर्व माहिती उघड केली जाईल. तसेच भारतीय नागरिकाचे परदेशात असलेले प्रत्येक बँक खाते बेकायदा असतेच असे नाही; तरीही त्या खातेदाराने काहीतरी बेकायदा केले असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा असल्याखेरीज त्याचे नाव उघड करता येणार नाही.