दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी

By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 06:20 PM2021-01-29T18:20:55+5:302021-01-29T18:22:13+5:30

अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल

Explosion near Israeli embassy in Delhi windscreen of several cars damaged police spacial team on spot | दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी

दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी

Next
ठळक मुद्दे अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखलपोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी

दिल्लीतील असलेल्या इस्रायलच्या दुतावासाहेर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. 

इस्रायलच्या दुतावासापासून १५० मीटर अंतरावर काही गाड्या उभ्या होत्या. याच ठिकाणी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. "या स्फोटात कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी उभ्या असेलेल्या काही गाड्यांचं नुकसान झालं आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुरूवातीच्या तपासात काही समजाकंटकांचा हात असल्याचं दिसून येत आहे," अशी माहिती दिल्लीपोलिसांकडून देण्यात आली. 





"आम्हाला ५ वाजून ४५ मिनिटांनी या ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही," असं अग्नीशमन विभागाचे अधिकारी प्रेम पाल यांनी सांगितलं. हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या घटनेनंतर संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेराव घातला आहे. एकीकडे दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.  



भारत आणि इस्त्रायल आज दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना २९ वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. भारतातील इस्रायलच्या दुतावासानं यासंबंधी ट्वीटही केलं होतं. विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी हा स्फोट झाला. दरम्यान, विजय चौकात बिटिंग रिट्रिट सेरेमनी पार पडली. या ठिकाणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ सदस्यदेखील उपस्थित होते. 

Web Title: Explosion near Israeli embassy in Delhi windscreen of several cars damaged police spacial team on spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.