शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: पहिल्याच सभेत फडणवीसांनी काढली मनातली भडास, ज्युनिअर ठाकरेंनाही सोडलं नाही! काय म्हणाले?
2
Eknath Shinde: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ' वरळीतील सभेत एकनाथ शिंदे कडाडले!
3
Vasai: वसईमध्ये बहिणीवर गोळीबार करणारा आरोपी मुंब्य्रात अटक, नेमके प्रकरण काय?
4
वैभव सूर्यवंशीचा भीमपराक्रम; १९ वर्षे जुना विक्रम मोडला, १४ वर्षाच्या पोरानं आता काय केलं?
5
Nilambari Jagdale: नागपूरकर नीलांबरी बनल्या लुधियानाच्या डीआयजी, पंजाबमध्ये ‘लेडी सिंघम’ म्हणून दरारा!
6
Kim Jong Un : "माझे मित्र मादुरो यांना तातडीने सोडा, अन्यथा..."; अमेरिका-व्हेनेझुएला संघर्षात किम जोंग उनची एन्ट्री
7
सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक! रश्मी शुक्ला यांच्याकडून स्वीकारला पदभार
8
उद्धवसेनेच्या उमेदवारास 'मशाल' चिन्ह नाकारले; निवडणूक अधिकारी- दानवे समोरासमोर
9
ऑपरेशन सिंदूरचा धसका, ब्रह्मोसला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडून 'तैमूर' मिसाईलची चाचणी
10
"अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे..."; Viral Video वरून काँग्रेसची टीका
11
Hyderabad: मुलांसोबत तलावाजवळ गेली अन्...; आईचं भयानक कृत्य, नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली!
12
हलगर्जीपणाचा कळस! दीडवर्ष असह्य वेदना; ऑपरेशन करताना पोटात विसरले कात्री, महिलेचा मृत्यू
13
Smartphone: थेट ब्लॅकबेरी आणि आयफोनशी स्पर्धा? धमाकेदार अँड्राईड फोन बाजारात, कुणी केला लॉन्च?
14
पालघरजवळच्या खाडीत सहा-सात बगळे मृत अन् अर्धमेल्या अवस्थेत! संसर्ग की घातपात, चर्चांना उधाण
15
Donald Trump : "आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
16
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
17
"ते तर आता 'लीडर ऑफ पर्यटन'"; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर भाजपाची बोचरी टीका
18
टीम इंडियासाठी 'गुड न्यूज'! Shreyas Iyerला 'कमबॅक'साठी BCCIची मान्यता, 'या' तारखेला खेळणार
19
बांगलादेशात हिंदूंचं जगणं कठीण! एकाला खांबाला बांधून अमानुष मारहाण, प्रकृती चिंतानजक
20
Tarot Card: स्वामींचं नाव घेत एक कार्ड निवडा आणि पुढच्या आठवड्याचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात स्फोट, स्फोटामुळे जमिनीत पडला मोठा खड्डा; दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 14:15 IST

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीच्या रोहिणी कोर्टातून आज एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका क्रूड बॉम्बचा स्फोट झाला असून, हा कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोटाचा प्रकार आहे. मात्र, यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून आयईडी, स्फोटके, खिळे आणि टिफिनसारखी वस्तू जप्त केली आहे. 

सध्या दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच, स्फोटानंतर एनएसजीच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळाची नाकेबंदी करून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. याशिवाय रोहिणी न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्याची सुनावणी थांबवण्यात आली आहे. सध्या दिल्ली पोलिसांचे उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

स्फोटात दोघे जखमीदिल्ली अग्निशमन विभागाने सांगितल्यानुसार, रोहिणी कोर्टातून सकाळी 10:40 वाजता स्फोटाचा कॉल आला, त्यानंतर 7 अग्निशमन दल घटनास्थळी पाठवण्यात आले. रोहिणी कोर्ट कॅम्पसमध्ये झालेल्या स्फोटामुळे घबराट पसरली असून, स्फोटात 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय लॅपटॉपमुळे हा स्फोट झाला असावा, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात झालेल्या स्फोटात दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांना CAT च्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी रोहिणी जिल्ह्यातील डीसीपी आणि एसीपी आरती शर्मा टीम फोर्ससह रोहिणी कोर्टात पोहोचल्या आहेत. यादरम्यान पोलीस तपास पथकाला न्यायालय क्रमांक 102 मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा स्फोट झाल्याचे आढळले, त्यानंतर लोकांनी गोळीबार झाल्याची अफवा पसरवली होती, त्यामुळे संपूर्ण कोर्टात एकच खळबळ उडाली होती. 

रोहिणी कोर्टात गुंडाची हत्या

काही दिवसांपूर्वी हल्लेखोरांनी गोगी टोळीचा गुंड जितेंद्र मान उर्फ ​​गोगी याची रोहिणी न्यायालयात गोळ्या घालून हत्या केली होती. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी गोगीवर हल्ला करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना जागीच ठार केले होते. सध्या रोहिणी न्यायालयात सर्व कामकाज सुरळीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीCourtन्यायालय