शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर रेल्वेतून अनुभवा पृथ्वीवरील नंदनवनाचे सौंदर्य; विविध रूपे पाहून सर्वांना होईल आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:04 IST

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, जे इंग्रज करू शकले नाहीत, ते पंतप्रधान मोदींनी केले

सुरेश एस डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, कटरा: जगातील सर्वात उंच असलेल्या कमानी रेल्वे पुलावरून धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस हे आता केवळ स्वप्न न उरता ती गोष्ट प्रत्यक्षात साकारली आहे. पृथ्वीवरील नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये रेल्वेतून प्रवास करणे ही एक नेत्रसुखद प्रवासाची संधी आहे. पर्यटक, प्रवासी तेथील निसर्गरम्य परिसर पाहून अतिशय आनंदी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कटरा आणि श्रीनगर यादरम्यान धावणाऱ्या दोन खास वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमुळे प्रवासाचा कालावधी २-३ तासांनी कमी झाला आहे. तसेच, काश्मीर खोऱ्याशी सर्व ऋतूंमध्ये संपर्क राखता येईल, असा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. काश्मीरमधील ट्रेन खोल दऱ्या, हिमालयाच्या भव्य शिखरांचे दर्शन घडवत व घनदाट जंगलांनी वेढलेल्या पर्वतराजीतून वाट काढत धावते. शिवालिक डोंगररांगेत खोदलेल्या बोगद्यांतून आणि चिनाब नदीला प्रवास करत ही रेल्वे निसर्गाशीच जणू संवाद साधते. जम्मूतील कटरा ते श्रीनगर ही रेल्वे सफर ही देशातील सर्वात नयनरम्य प्रवासांपैकी एक ठरली आहे.

लोको पायलट मनोजकुमार मीणा यांनी सांगितले की, ही फक्त एक ट्रेन नाही, तर ही निसर्गाच्या जादूई दुनियेतील सफर आहे. जे इंग्रज करू शकले नाहीत, ते पंतप्रधान मोदींनी केले या शब्दांत मुख्यमंत्री अब्दुल्लांनी कौतुक केले.

मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर वंदे भारत ट्रेन चिनाब पुलावर पोहोचली, तेव्हा ट्रेनमधील विद्यार्थ्यांनी जय मातादीचा जयघोष केला. मोदींनीही चिनाब पुलाची पाहणी केली.

बदलत्या दृश्यांची पडते भुरळ

रेल्वे कर्मचारी साहिलकुमार म्हणाले की, ही ट्रेन काश्मीरमधील डोंगराळ भागात पोहोचते तेव्हा विविध ऋतूंमधील बदलती दृश्य भूरळ घालतात. हिमाच्छादित जंगलं, वसंतात फुललेली झाडं, उन्हाळ्यातील निसर्ग आणि शरद ऋतूतील सोनसळी छटा अशी निसर्गरूपे समोर येतात. 

अभियांत्रिकी चमत्कारांनी घडलेला नवा मार्ग

काश्मीर रेल्वे मार्गातील कटरा-बनिहाल या दरम्यानचा आणखी एक अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे अंजी खड्ड पूल. हा भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. ७२५ मीटर लांब आणि ३३१ मीटर उंचीचा हा पूल ९६ केबलवर उभा आहे आणि पर्यटकांसाठी ते एक खास आकर्षण आहे. २७२ किलोमीटर लांब उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे प्रकल्प सुमारे ४३,७८० रुपये कोटी खर्च करून पूर्ण करण्यात आला. त्यात ३६ बोगदे (एकूण ११९ किमी) आणि ९४३ पूल आहेत. या मार्गावरून रेल्वेने प्रवास करा व भारतातील स्वित्झर्लंडचा अनुभव घ्या, असे वर्णन अनेकांनी केले आहे. 

डिमोशन झाले, पण चूक दुरुस्त होईल : अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांकडे केली. ते म्हणाले की, कटरा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाले त्यावेळी मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता मी केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. एकप्रकारे हे थोडेसे डिमोशनच झाले आहे. पण, मला विश्वास आहे की ही चूक लवकरच दुरुस्त होईल. जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा बहाल केला जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOmar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर