शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मेघालयात खाणीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांना चमत्कार घडण्याची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 05:38 IST

मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

गुवाहाटी : मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. काहीतरी चमत्कार घडून हे सारे जण बचावतील, अशी आशा त्यांच्यापैकी काही जणांच्या नातेवाईकांना अजूनही वाटत आहे.या राज्यातील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणींमध्ये बेकायदेशीररीत्या खाणकाम केले जाते. तेथील एका खाणीत अशाच प्रकारे बोगदा खणत असताना ही दुर्घटना घडली. मेघालयाचे आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री केरमेन शीला यांनी सांगितले की, देव काहीतरी चमत्कार घडवेल व या साऱ्यांना वाचवेल, अशी आशा वाटते.खाणीशेजारच्या नदीतून आणखी पाणी बोगद्यात घुसल्याने रविवारी बचावकार्य तात्पुरते थांबविण्यात आले होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे १०० जवान या खाणीच्या जवळच तळ ठोकून आहेत. बचावकार्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध होत नसल्याने या कामात खूप अडचणी येत आहेत.या खाणीत अडकलेल्या पंधरा कामगारांमध्ये सात जण पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील आहेत. त्याशिवाय त्यात आसाममधील पाच, जिथे ही दुर्घटना झाली त्या लुमथारी गावातील तीन जणांचाही समावेश आहे. या कामगारांपैकी एकही जण बचावणार नाही, असे खाणीत अडकलेल्यांपैकी काही जणांच्या नातेवाईकांना वाटते, तर काही जणांना चमत्कार घडून सगळे सुखरूप परततील, अशी आशाआहे. (वृत्तसंस्था)कॅमेºयांसमोर पोझ देणे मोदींनी थांबवून त्यांना वाचवावे : राहुल गांधीनवी दिल्ली : बोगीबिल पुलाच्या बांधणीबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेणे, कॅमेºयांसमोर पोज देणे या गोष्टी करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयातील कोळसा खाणीमध्ये अडकलेल्या १५ जणांना वाचवावे, असे कळकळीचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. या खाणीमध्ये घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेले उच्च दाबाचे पंप देण्यास मोदी सरकारने असमर्थतता दर्शविली आहे.राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आसाममधील पुलाचे श्रेय घेण्याकरिता सरसावलेल्या मोदींना त्याच्या शेजारील मेघालय राज्यात १५ जण खाणीत अडकले आहेत, त्यांना तिथे मोकळा श्वास घेणेही कठीण जात आहे याचे काहीही सोयरसुतक नाही.मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यातील कोळसा खाणीत १३ डिसेंबरपासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे त्या राज्याच्या गृहखात्याने म्हटले आहे. येथील कोळसा खाणींत बेकायदा खाणकाम चालते. त्यासाठी बालमजुरांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या गोष्टी रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र सरकारने पावले उचलली होती.

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत