शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

त्यामुळे  चुकीचे ठरू शकतात लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 09:54 IST

बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला आघाडी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निकालही तसाच लागेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी आता 24 तासांहून कमी अवधी राहिला आहे. दरम्यान,  मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधून केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपा आणि एनडीएला आघाडी दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात निकालही तसाच लागेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. कारण अनेकदा एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकाल यात कमालीची तफावत दिसून आलेली आहे. त्यामुळे गुरुवारीसुद्धा प्रत्यक्ष निकाल आणि एक्झिट पोल यांच्यात फरक दिसू शकत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेत पुनरागमन करेल, असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलनी वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात  मतमोजणीनंतर निकाल वेगळेच लागले. 2009 मध्ये सुद्धा एनडीए आणि यूपीएमध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता एक्झिट पोलनी वर्तवली होती. मात्र यूपीएने एकतर्फी विजय मिळवला होता.  एक्झिट पोल चुकीचे ठरण्याची अनेक कारणे आहेत. एक्झिट पोलचा सर्वे करण्यासाठी फार कमी मतदारांचे मत विचारात घेतले जाते. हे ठरावीक मतदार म्हणजे सर्व मतदारांचे प्रतिनिधी ठरत नाही. एक्झिट पोलसाठी घेतलेल्या मतदारांच्या मताची सॅम्पल साइझ खूप कमी असल्याने काही चूक झाल्यास त्याचा निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो. असे एक्झिट पोल पक्षांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण जाणून घेण्याच्या दृष्टीने डिझाइन केले जातात. त्यात प्रत्यक्ष किती जागा मिळणार याची चर्चा होत नाही. नंतर हे मतांचे प्रमाण जागांमध्ये परिवर्तीत केले जाते. त्यामुळे जागांचा योग्य अंदाज काढणे कठीण होते. त्यातही जर बहुरंगी लढत असेल तर मतदानाच्या टक्केवारीवरून जागांचा अंदाज लावणे कठीण होते. 

 एक्झिट पोल चुकीचे ठरल्यास त्याची अनेक कारणे सांगितली जाता. उदाहरणच द्यायचं तर कौल जाणून घेण्यासाठी चुकीच्या मतदारांना मिळालेले प्राधान्य, संबंधित मतदारांनी दिलेली चुकीची उत्तरे, कल जाणून घेण्यासाठी घेतलेल्या नमुन्यात असलेल्या चुका, तसेच सर्वसामान्यांच्या अपेक्षेनुरूप निकाल दाखवण्यासाठी केलेला फेरफार, अशी कारणे एक्झिट पोल चुकीचे ठरल्यानंतर दिले जातात. दरम्यान, मतमोजणीवेळी प्रथम व्हीव्हीपॅटची मतमोजणी करायची की इव्हीएममधील मतांची मोजणी करायची याचा निर्णय निवडणूक आयोग आज घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही पाच पोलिंग बूथवरील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांजी मोजणी करून त्यांची आकडेवारी जुळवून घेण्यात येणार आहे. मंगळावारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन प्रथम व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्याची मागणी केली होती.  

 

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस