शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 17:10 IST

EXIT POLL: लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेद्वारे संपूर्ण देशाचा दौरा केला होता.

EXIT POLL: लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या, म्हणजेच 4 जून रोजी जाहीर होणार आहेत. तत्पुर्वी एक्झिट पोलमधून बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वातील NDA ला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रा' आणि 'भारत न्याय यात्रे'चे एक्झिट पोल समोर आले आहेत. यात्रेचा काँग्रेसला किती फायदा झाला, हे यातून स्पष्ट होत आहे. 

हा एक्झिट पोल TV9, पीपल्स इनसाइट आणि पोलस्ट्रॅटचा आहे. एक्झिट पोलनुसार, राहुल गांधींनी केलेल्या दोन यात्रेत लोकसभेच्या 154 जागा कव्हर केल्या, त्यापैकी इंडिया आघाडी 47 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. म्हणजेच इंडिया आघाडीला एक तृतीयांशपेक्षा कमी जागा मिळत आहेत, तर एनडीएच्या खात्यात 103 जागा जाऊ शकतात.

भारत जोडो यात्राराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 पर्यंत चालली. या काळात राहुल यांनी काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास केला होता. या दौऱ्यात राहुल गांधी 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशात गेले. राहुल यांनी भेट दिलेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. यामध्ये त्यांनी 64 मतदारसंघ कव्हर केले. पण, एक्झिट पोलनुसार, यातील केवळ 24 जागांवर इंडिया आघाडीला विजय मिळताना दिसत आहे. तर, एनडीएच्या खात्यात 38 जागा येत आहेत.

भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी ते 17 मार्च 2024 पर्यंत चालली. या दुसऱ्या यात्रेत 15 राज्ये, 110 जिल्हे आणि 90 लोकसभेच्या जागांचा समावेश करण्यात आला होता. मणिपूरपासून सुरू झालेला हा प्रवास मुंबईत संपला. या काळात राहुल यांनी मणिपूर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांचा दौरा केला. एक्झिट पोलनुसार, यापैकी इंडिया आघाडीच्या खात्यात 23 जागा जात आहेत, तर एनडीए 65 जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेस