शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll म्हणजे Exact Poll नव्हे; काँग्रेसने निकालांचे अंदाज फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 14:00 IST

2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे एक्झिट पोल आल्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमताचे आकडे गाठेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र या एक्झिट पोलच्या आकडेवारीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी अनेक एक्झिट पोलमधून काँग्रेसचा पराभव होईल असं वर्तविण्यात आलं होतं असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागला याचे परिणाम सगळ्यांनी पाहिले. तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी एक्झिट पोलला एक्झॅट पोल मानायला नकार दिला आहे. 

काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, ज्याप्रकारे एक्झिट पोलमध्ये आकडेवारी दाखविण्यात आली आहे तशी शक्यता फार कमी आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विट करत 2004 मध्ये एक्झिट पोल दाखविले होते. 2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निकालांचे एक्झिट पोल दाखविले होते. त्यात काँग्रेसचा पराभव होईल सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात निकाल उलट लागले होते. त्यामुळे 23 मे पर्यंत वाट पाहावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रत्यक्ष निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल आणि भाजपाच्या आश्वासनाचा बुरखा फाटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच काँग्रेसचे संघटन प्रभारी उपाध्यक्ष चंद्रप्रभाष शेखर यांचे म्हणणं आहे की, मध्य प्रदेशात काँग्रेस 22 जागा जिंकेल. एक्झिट पोलमधून जी आकडेवारी येतेय ती चुकीची ठरेल. जनमाणसात लोकांची मते काँग्रेसला आहेत. त्यामुळे 23 मे रोजी येणारे प्रत्यक्ष निकाल हे एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची ठरविणारे असतील असं सांगितले. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून प्रत्येक राज्यात जनतेमध्ये भाजप आणि काँग्रेसबद्दल काय वातावरण हे समोर आलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य प्रदेशातल्या 29 जागांपैकी भाजपाला 26-28 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसला 1 ते 3 जागा मिळण्याचा कयास आहे.

टॅग्स :Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९