शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Exit Poll 2021: ममतांची हॅट् ट्रिक, भाजपचीही मुसंडी; तामिळनाडूत अण्णाद्रमुकला धक्का; एक्झिट पोलचे निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 06:25 IST

आसामात भाजप सत्ता राखणार, केरळात पुन्हा एलडीएफ

नवी दिल्ली : ऐन कोरोनाकहरात झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया गुरुवारी समाप्त झाली. त्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांत पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षच सत्ता स्थापन करेल असा अंदाज सर्वच सर्वेक्षण संस्थांनी वर्तवला आहे. 

तामिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुकला जनरोषाचा फटका बसेल तर आसाम आणि केरळात अनुक्रमे भाजप व माकपप्रणीत एलडीएफ सत्ता राखण्यात यशस्वी ठरतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. पुदुच्चेरीत मात्र सत्तेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या विधानसभा निवडणूकांचे निकाल येत्या २ मे राेजी लागणार आहेत. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

भाजप मुसंडी मारणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये लाखालाखांच्या उपस्थितीत सभा घेतल्या. ममता बॅनर्जींनीही आक्रमक प्रचार केला. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालकडे लागले आहे. एक्झिट पोल्सनी बंगालमध्ये पुन्हा ममतांच्या तृणमूलचीच सत्ता येईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, असे असले तरी भाजप १०० पेक्षाही अधिक जागा मिळवून मुसंडी मारण्याच्या तयारीत असल्याचे निष्कर्षांमध्ये दिसून येते.

पुदुच्चेरीत रस्सीखेच

अवघ्या ३० जागांच्या पुदुच्चेरी विधानसभेत भाजपप्रणीत रालोआ आणि काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तामिळनाडूत धक्का :

तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाला पायउतार व्हावे लागेल, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. तिथे द्रमुकला स्पष्ट बहुमत मिळून तो पक्ष सत्तेत येण्याची चिन्हे आहेत.  

आसामात भाजपच :

एनआरसी आणि सीएए या मुद्द्यांमुळे आसामची निवडणूक राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरली होती. या ठिकाणी भाजपच पुन्हा सत्तेवर मांड ठोकेल, असे भाकीत एक्झिट पोल्सनी वर्तवले आहे. 

केरळात एलडीएफ :

मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ या माकपप्रणीत डाव्या आघाडीलाच पुन्हा पसंती मिळेल, असा अंदाज आहे. ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवत भाजपने केरळात जोर मारण्याचा प्रयत्न केला असला तरी मल्याळी जनतेला ते रूचलेले दिसत नाही.

प. बंगाल

संस्था    तृणमूल    भाजप    डावी आघाडी    रिपब्लिक-सीएनएक्स    १२८-१३८    १३८-१४८    ११-२१    इंडिया टुडे-ॲक्सिस    १३०-१५६    १३४-१६०    ०-२०    एबीपी सी-व्होटर    १५२-१६४    १०९-१२१    १४-२५टाइम्स नाऊ सी-व्होटर    १५८    ११५    १९जन की बात    १०४-१२१    १६२-१८५    ३-९ईटीजी रिसर्च    १६४-१७६    १०५-११५    १०-१५पी मार्क    १५२-१७२    ११२-१३२    १०-२०सीएनएन न्यूज१८    १६२    ११५    १५टुडेज-चाणक्य    १८०    १०८    ४

तामिळनाडू

संस्था    डीएमके+    एआयडीएमके+    एएएमकेरिपब्लिक-सीएनएक्स    १६०-१७०    ५८-६८    ४-६    टुडेज-चाणक्य    १६४-१८६    ४६-६८    ०    पी-मार्क    १६५-१९०    ४०-६५    १-३

केरळ

संस्था    एलडीएफ    यूडीएफ    एनडीएरिपब्लिक-सीएनएक्स    ७२-८०    ५८-६४    १-५इंडिया टुडे-ॲक्सिस    १०४-१२०    २०-३६    ०-२पोल डायरी    ७७-८७    ५१-६१    २-३पी-मार्क    ७२-७९    ६०-६६    ०-३

आसाम

संस्था    भाजप+    काँग्रेस+रिपब्लिक-सीएनएक्स    ७४-८४    ४०-५०    इंडिया टुडे-ॲक्सिस    ७५-८५    ४०-५०एबीपी सी-व्होटर    ५८-७१    ५३-६६    टुडेज-चाणक्य    ६१-७९    ४७-६५पी-मार्क    ६२-७०    ५६-६४

पुदुच्चेरी

संस्था    भाजप    काँग्रेसरिपब्लिक-सीएनएक्स    १६-२०    ११-१३

 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१TamilnaduतामिळनाडूMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021