चिनी दूतावासासमोर व्हिएतनाममध्ये निदर्शने
By Admin | Updated: May 11, 2014 23:56 IST2014-05-11T19:34:32+5:302014-05-11T23:56:57+5:30
दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त क्षेत्रात चिनी जहाजांच्या कुरापतीवरून निर्माण झालेल्या तणावानंतर व्हिएतनामच्या नागरिकांनी राजधानी हनोईतील चिनी दूतावासासमोर रविवारी निदर्शने केली.

चिनी दूतावासासमोर व्हिएतनाममध्ये निदर्शने
हनोई : दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त क्षेत्रात चिनी जहाजांच्या कुरापतीवरून निर्माण झालेल्या तणावानंतर व्हिएतनामच्या नागरिकांनी राजधानी हनोईतील चिनी दूतावासासमोर रविवारी निदर्शने केली.
निदर्शकांनी चीनविरुद्ध घोषणाबाजी केली. निदर्शकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली होती. चीनविरोधी निदर्शनांत व्हिएतनाम सरकारचे विरोधकही सहभागी झाले होते. वादग्रस्त क्षेत्रात चीन नौसैनिक तैनात करण्यात आल्यानंतर व्हिएतनामने जहाजाचा एक मोठा ताफा पाठविला होता. आपल्या जहाजाला चिनी जहाजांनी धडक मारली असल्याचा व्हिएतनामचा आरोप आहे. अलीकडील संघर्षामुळे वादग्रस्त सागरी क्षेत्राबाबतचा तणाव आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.