... तर खालशांच्या २०० साधू-महंतांचे शाहीस्नानावर बहिष्कार
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:48+5:302015-09-03T23:05:48+5:30
नाशिक : पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. सदर नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे.

... तर खालशांच्या २०० साधू-महंतांचे शाहीस्नानावर बहिष्कार
न शिक : पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणार्या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले. सदर नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नान बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे.पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन भाविकांसाठी सुरक्षा होती की, कर्फ्यु होता हेच कळले नसल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या बॅरिकेडिंगमुळे भाविकांना शाहीस्नानासाठी कोसो दूर पायपीट करावी लागली. इतर ठिकाणीही कुंभमेळा भरतो. त्याठिकाणचे पोलिसांकडून भाविकांना त्रास होईल, असे नियोजन केले जात नसल्याचे त्यांनी म्हटले. रामकुंड व साधुग्रामपासून दहा किलोमीटरच्या जवळपासचे सर्व रस्ते बंद करण्यात आल्याने भाविकांना शाही मिरवणुकीचे दर्शनही झाले नाही. त्यामुळे स्थानिक व परराज्यातून येणार्या भाविकांकडून नाराजी व्यक्तकेली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी पुढील पर्वणी काळात भाविकांची गैरसोय होऊन नये, भाविकांची कमीत कमी पायपीट होऊन योग्य नियोजन होण्याची अपेक्षा व्यक्त केली. सुरक्षेला विरोध नाही, सुरक्षा पाहिजेच, मात्र भाविकांचे हाल होणार नाहीत यांचा विचार होण्याची गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाविकांची श्रद्धा असल्याने कुंभमेळ्यात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. भाविकांच्या अडचणी वाढल्यास संख्या अजून घटणार आहे. त्यामुळे नियोजनात बदल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी दीपंेद्रसिंह कुशवाह यांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इन्फो : पर्वणी काळात बससेवा हवी परराज्यातून येणार्या भाविकांना रस्त्यांची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे स्नानाचा घाट व रस्ता त्यांना समजत नाही. पायपीट जास्त करावी लागल्याने शाहीस्नान न करताच भाविकांना परतण्याची वेळ आली. वृद्ध, मुलांना एवढे अंतर चालत जाणे शक्य होत नाही. त्यासाठी शहर बससेवा सुरू ठेवण्यात यावी.