युद्ध झाल्यास भारतीय फायटर जेट चीनवर करतील मात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 18:52 IST2017-08-09T18:52:33+5:302017-08-09T18:52:45+5:30

जर हवाई युद्ध झालंच, तर भारताकडून चीनचा पराभव निश्चित आहे.

Exclusive: Why Indian Air Force May Best Chinese Jets In An Air Battle Over Tibet | युद्ध झाल्यास भारतीय फायटर जेट चीनवर करतील मात !

युद्ध झाल्यास भारतीय फायटर जेट चीनवर करतील मात !

नवी दिल्ली, दि. 9 - गेल्या काही दिवसांपासून भारत-चीनदरम्यान वाद उफाळून आला असून, चीन वारंवार भारताला युद्धाच्या धमक्या देत आहे. तसेच एखाद्या वेळेस डोंगर हलवणं शक्य आहे, मात्र चीनच्या लष्करावर कोणीही मात करू शकत नाही, असंही चीननं म्हटलं होतं. मात्र जर हवाई युद्ध झालंच, तर भारताकडून चीनचा पराभव निश्चित आहे.

भारताच्या लढाऊ विमानांसमोर चीनची विमानं तग धरू शकत नाहीत. भारताचं मिराज-2000 हे लढाऊ विमान हाताळणारे स्क्वाड्रन लीडर समीर जोशी यांनी ही माहिती दिली आहे. भारत व चीन या दोन्ही देशांतील हवाई दलाच्या सामर्थ्याचा अभ्यास करून समीर जोशींनी एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात त्यांनी भारत आणि चीनच्या कमकुवत आणि मजबूत बाजू सविस्तरपणे नमूद केल्या आहेत. द ड्रॅगन क्लॉज: असेसिंग चायना पीएलएएएफ (The Dragon’s Claws: Assessing China’s PLAAF Today) या अहवालात दोन्ही देशांमधील हवाई दलाच्या सामर्थ्याची माहिती देण्यात आली आहे. भारत-चीनमध्ये तिबेट आणि आसपासच्या भागात युद्ध झाल्यास भारतीय हवाई दल चीनवर नक्कीच मात करेल, असं या अहवालात म्हटलं आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सची (पीएलएएएफ) अनेक विमानतळं तिबेटच्या पठाराच्या खूप खाली आहेत. त्यामुळे उड्डाण करत तिबेटच्या पठारावर येण्यासाठी विमानाला भरपूर मोठं उड्डाण करावं लागणार आहे. विमान तिबेटच्या पठारावर येईपर्यंत विमानाचे बरंच इंधन कमी होईल. त्यामुळे साहजिकच विमानाच्या इंजिनावर मोठा ताण पडेल. या सर्व प्रकारामुळे विमानाच्या वेगावरही मर्यादा येतील आणि लढाऊ विमानांचा वेग मंदावेल, असंही समीर जोशी म्हणाले आहेत. मात्र या बाबतीत भारत चीनपेक्षा उजवा आहे. भारताची तेजपुर, कलाईकुंडा, छाबुआ आणि हाशीमारा ही विमानतळं येथे आहेत. तिबेटच्या पठाराची उंची आणि भारताची विमानतळं असलेल्या जागांची उंची यात मोठं अंतर नाही. त्यामुळे भारताची विमानं तिबेटच्या आकाशात चिनी विमानांच्या तुलनेत कमी इंधन वापरून उंचीवरून हल्ला करण्यास सक्षम आहेत, असे समीर जोशी म्हणाले आहेत. 

Web Title: Exclusive: Why Indian Air Force May Best Chinese Jets In An Air Battle Over Tibet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.