शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

त्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाच्या सर्व शक्यता पडताळून पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:04 IST

सर्वाेच्च न्यायालयाचे मुंबई आयआयटीला निर्देश

ठळक मुद्देप्रिंस जयबीर सिंह या विद्यार्थ्याला आरक्षित प्रवर्गात ८६४ वा क्रमांक मिळाला हाेता. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने सांगितले

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तांत्रिक अडचणीमुळे क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरता न आल्यामुळे मुंबईच्या आयआयटीमध्ये प्रवेश नाकारलेल्या दलित विद्यार्थ्याला सर्वाेच्च न्यायालयाने आधार दिला आहे. काेणास ठावूक, हा मुलगा भविष्यात देशाचे नेतृत्व करेल?, असे मत नाेंदवून न्यायालयाने त्याला प्रवेश देण्यासाठी ३ दिवसांत सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले.

प्रिंस जयबीर सिंह या विद्यार्थ्याला आरक्षित प्रवर्गात ८६४ वा क्रमांक मिळाला हाेता. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने सांगितले, की त्याची काहीही चूक नसताना त्याला प्रवेश घेता आलेला नाही. किती मुलांना आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते? काेणास ठावूक, हा मुलगा देशाचे नेतृत्व करेल? कायद्यातील मुद्द्यांकडे बाेट दाखवून आपण त्याला उच्च न्यायालयाप्रमाणे दार दाखवू शकताे. मात्र, मानवतेच्या दृष्टिकाेनातून न्यायालयाने कधीकधी कायद्याच्या पलीकडे जायला हवे. 

काय आहे प्रकरण ?प्रिंंस याला आयआयटी मुंबईमध्ये सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये संधी मिळाली हाेती. मात्र, २७ ऑक्टाेबरला क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट जमा करता आले नाही. बराच प्रयत्न करूनही त्याला अपयश आले. याबाबत त्याने आयआयटीच्या व्यवस्थापनाला अनेक ई-मेल पाठविले आणि काॅल्सही केले. मात्र, त्याला काेणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIIT Mumbaiआयआयटी मुंबई