शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“दावा ३० कोटींचा, पण खरं लसीकरण ४ कोटीच”; माजी केंद्रीय मंत्र्याचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 15:03 IST

माजी केंद्रीय मंत्र्यानं लसीकरणाच्या वेगावर व्यक्त केली चिंता. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देमाजी केंद्रीय मंत्र्यानं लसीकरणाच्या वेगावर व्यक्त केली चिंता. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी लसींची कमतरता असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी करोनाच्या लसीकरणावर (Covid Vaccination) वेगावर चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारवर (Narendra Modi Government) निशाणा साधला आहे. आम्हाला लस हवी आहे, अश्रू नकोत, असंही ते म्हणाले आहेत. “केंद्र सरकारनं २१ जानेवारी २०२१ रोजी दावा केला होता की जुलै अखेरपर्यंत ३० कोटी भारतीयाचं पूर्ण लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की २२ मे २०२१ पर्यंत केवळ ४.१ कोटी भारतीयांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत,” असं जयराम रमेश म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर निशाणा साधला. “केंद्र सरकारनं २१ मे रोजी दावा केला होता की २०२१ च्या अखेरपर्यंत भारतात सर्व ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की २१ मे रोजी एका दिवसात केवळ १४५ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. आम्हाला लस हवी आहे मगरीचे अश्रू नकोत,” असंही ते म्हणाले. मोदी झाले होते भावूककोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा केली. त्यांनी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. त्यावेळी, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावलंय. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केलंय, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असंही मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतcongressकाँग्रेस