शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

गुजराल यांचं ऐकलं असतं तर शीख दंगली झाल्या नसत्या - मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 06:44 IST

'कदाचित 1984 चा नरसंहार होण्यापासून वाचला असता'

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984 च्या शीख दंगलीवरून मोठे वक्तव्य केले आहे. जर तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर दिल्लीत शीख नरसंहार झाला नसता, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. बुधवारी दिल्लीत माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत होते. 

दिल्लीत 1984 ला शिख दंगली होत होत्या. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे गेले होते. त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांना सांगितले की, परिस्थिती गंभीर असून सरकारला लवकरात लवकर लष्कराला बोलावणे गरजेचे आहे. जर पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकून आवश्यक कारवाई केली असती तर कदाचित 1984 चा नरसंहार होण्यापासून वाचला असता, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यावेळी म्हणाले. 

1984 मध्ये देशभर दंगली झाल्या होत्या1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दोन शीख अंगरक्षकांकडून  हत्या झाल्यानंतर देशात शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 3,000 शिखांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत जास्त दंगली उसळल्या होत्या. असे सांगण्यात येते की, 3,000 पैकी 2733 शिखांची हत्या दिल्लीत झाली होती.

2012 मध्ये गुजराल यांचे निधनदेशाचे 12 वे पंतप्रधान असलेल्या इंद्रकुमार गुजराल यांना अतिशय अल्प कालावधीसाठी पदावर राहता आले. इंद्रकुमार गुजराल हे 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 या काळात देशाचे पंतप्रधान होते. 30 नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांचे निधन झाले. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगल