गुजराल यांचं ऐकलं असतं तर शीख दंगली झाल्या नसत्या - मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 06:41 AM2019-12-05T06:41:17+5:302019-12-05T06:44:45+5:30

'कदाचित 1984 चा नरसंहार होण्यापासून वाचला असता'

Ex Pm Manmohan Singh Said That If Ik Gujral Advice Has Been Heeded Perhaps 1984 Massacre Could Have Been Avoided | गुजराल यांचं ऐकलं असतं तर शीख दंगली झाल्या नसत्या - मनमोहन सिंग

गुजराल यांचं ऐकलं असतं तर शीख दंगली झाल्या नसत्या - मनमोहन सिंग

Next

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1984 च्या शीख दंगलीवरून मोठे वक्तव्य केले आहे. जर तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर दिल्लीत शीख नरसंहार झाला नसता, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. बुधवारी दिल्लीत माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत होते. 

दिल्लीत 1984 ला शिख दंगली होत होत्या. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे गेले होते. त्यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांना सांगितले की, परिस्थिती गंभीर असून सरकारला लवकरात लवकर लष्कराला बोलावणे गरजेचे आहे. जर पी. व्ही. नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकून आवश्यक कारवाई केली असती तर कदाचित 1984 चा नरसंहार होण्यापासून वाचला असता, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यावेळी म्हणाले. 

1984 मध्ये देशभर दंगली झाल्या होत्या
1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दोन शीख अंगरक्षकांकडून  हत्या झाल्यानंतर देशात शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 3,000 शिखांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत जास्त दंगली उसळल्या होत्या. असे सांगण्यात येते की, 3,000 पैकी 2733 शिखांची हत्या दिल्लीत झाली होती.


2012 मध्ये गुजराल यांचे निधन
देशाचे 12 वे पंतप्रधान असलेल्या इंद्रकुमार गुजराल यांना अतिशय अल्प कालावधीसाठी पदावर राहता आले. इंद्रकुमार गुजराल हे 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 या काळात देशाचे पंतप्रधान होते. 30 नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांचे निधन झाले. 

Web Title: Ex Pm Manmohan Singh Said That If Ik Gujral Advice Has Been Heeded Perhaps 1984 Massacre Could Have Been Avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.