माजी सभापती नागवडेंच्या गळाला? बेलवंडीत झाले राजकीय गुफ्तगू
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:00+5:302015-03-08T00:31:00+5:30
श्रीगोंदा : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे समर्थक, माजी सभापती अरुण पाचपुते हे नागवडे गटाच्या गळाला लागले आहेत. अरुण पाचपुतेंची काष्टी गटातून उमेदवारी निित झाली आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकीय कुरूक्षेत्रात लवकरच भूकंप होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

माजी सभापती नागवडेंच्या गळाला? बेलवंडीत झाले राजकीय गुफ्तगू
श रीगोंदा : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे समर्थक, माजी सभापती अरुण पाचपुते हे नागवडे गटाच्या गळाला लागले आहेत. अरुण पाचपुतेंची काष्टी गटातून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकीय कुरूक्षेत्रात लवकरच भूकंप होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.शुक्रवारी रात्री बेलवंडीत माजी आमदार शिवाजीराव नागवडे, आ. राहुल जगताप, कुंडलिक जगताप, आण्णासाहेब शेलार, राजेंद्र नागवडे, धनसिंग भोयटे या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या गुप्त बैठकीतील चर्चेबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे.या बैठकीत श्रीगोंदा व कुकडी साखर कारखाना व जिल्हा बँक निवडणुकीत कशा पध्दतीने डावपेच टाकावे यावर चर्चा झाली. श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव हिरवे यांचाही निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश घडून आणण्यावर चर्चा झाली.अरूण पाचपुते यांना उमेदवारी दिली तर कैलास पाचपुते नाराज होऊ नयेत म्हणून याप्रसंगी या दोघांनाही उमेदवारी द्यावी, त्यासाठी काँगेसचे तालुकाध्यक्ष धनसिंग भोयटे यांनी स्वत: थांबण्याची तयारी दर्शविली आहे, असे समजते. गेल्या कारखाना निवडणुकीत नागवडे गटाने कैलास पाचपुते व दिपक भोसले दोघांनाही उमेदवारी दिली होती, हाच फॉर्म्युला शक्य आहे.बबनराव पाचपुतेंनी अरूण पाचपुते व त्यांच्या पत्नी कलाबाई पाचपुते दोघांनाही सभापती केले होते. अरूण पाचपुतेंनी ३५ वर्षे बबनरावांना राजकारणात खंबीर साथ केली, त्यामुळे त्यांना टोकाचा राजकीय निर्णय घेणे अवघड आहे. भगवान पाचपुते व अरूण पाचपुते यांच्यातील अंतर्गत गटबाजी राजकीय समीकरणे बलदण्यास पुरेशी आहे.दिग्गज नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण केले, मात्र फोडाफोडीत कोणी कुण्याच्या घरात हात घालण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु नागवडेंनी प्रथमच अरूण पाचपुतेंना गळाला लावून बबनराव पाचपुतेंना हादरा देण्याची खेळी केली. भाऊबंदकी आणि एकनिष्ठेच्या राजकारणात नागवडेंची खेळी यशस्वी होणार का ? हाच खरा प्रश्न आहे.