शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 16:43 IST

माजी आयएएस, आयपीएस आणि आयएसएस अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली: साठ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेंट्रल व्हिसा पुनर्विकास प्रकल्पाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात माजी अधिकाऱ्यांनी २० हजार कोटींच्या सेंट्रल व्हिसा पुनर्विकास प्रकल्पाच्या सद्यस्थितीतल्या आवश्यकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. देशातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी पैशांची गरज असताना अशा प्रकल्पावर खर्च करणं बेजबाबदारपणाचं असल्याचं मत पत्रात व्यक्त करण्यात आलं आहे. सध्याच्या परिस्थितीत सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प रेटण्याची गरज काय, असा प्रश्न माजी अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. निवृत्त अधिकाऱ्यांनी पत्रात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. 'या प्रकल्पाबद्दल निर्णय घेण्याआधी संसदेत कोणतीही चर्चा झाली नाही. कोणत्याही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय प्रकल्पाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामासाठी निवडण्यात आलेली कंपनी आणि त्या कंपनीच्या निवडीबद्दलची प्रक्रिया याबद्दलचे अनेक प्रश्नदेखील अनुत्तरितच आहेत,' असं माजी अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे. 'कोरोनानंतरच्या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासणार आहे. याशिवाय अर्थव्यवस्थेचा गाडा पूर्ववत करण्यासाठी निधीची आवश्यकता असेल. या परिस्थितीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर २० हजार कोटी रुपये खर्च करणं बेजबाबदारपणाचं आहे,' अशा शब्दांमध्ये निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत. देशावर संकट असताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर केला जाणारा खर्चाची तुलना अधिकाऱ्यांनी थेट रोम जळत असताना गिटार वाजवणारा सम्राट निरोशी केली आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाबद्दल मोदींनी लिहिण्यात आलेल्या पत्रावर निवृत्त अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आयएएस, आयपीएस आणि आयएसएस अधिकाऱ्यांसोबतच डीडीएचे माजी उपसंचालक व्ही. एस. आयलावाडी आणि प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सिरकार यांनीदेखील पत्रावर स्वाक्षरी केली आहे.  सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पातून संसदेची नवी वास्तू बांधली जाणार आहे. याशिवाय नव्या सचिवालयाची उभारणी केली जाणार आहे. यासोबतच राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट मार्गात सुधारणा केल्या जाणार आहेत. या प्रकल्पावर २० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी...तरीही चीननं आपल्या लोकांना देशाबाहेर पाठवलं; अमेरिकेचा चीनवर 'गंभीर' आरोप...तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; निर्मला सीतारामन यांच्या विधानावरुन आव्हाडांचा निशाणा

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद