शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

EVM हॅकिंग: 'ती' पत्रकार परिषद काँग्रेसच्या सांगण्यावरूनच; भाजपाचे राहुल गांधीवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 13:25 IST

कथित EVM हॅकिंग प्रकरणावरून भाजपाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्दे लंडनमधील ती पत्रकार परिषद काँग्रेस पुरस्कृतकाँग्रेसकडून 90 कोटी मतदारांचा अपमान आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध, आशीष रे यांनी लंडनमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली

नवी दिल्ली -  कथित EVM हॅकिंग प्रकरणावरून भाजपानेकाँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लंडनमधील पत्रकार परिषद ही काँग्रेसने प्रायोजित केलेली होती. पत्रकार परिषदेचे आयोजक आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेटही घेतली होती, असा आरोप भाजपाने केला आहे.  तसेच काँग्रेसने या प्रकरणातून देशातील 90 कोटी मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान केला असून, देशाला जगात बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचे भाजपाने म्हटले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये EVM हॅकिंग प्रकरणी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लंडनमधील ही पत्रकार परिषद काँग्रेसने प्रायोजित केलेली होती. तसे नसते तर  काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल लंडनमधील हॅकेथॉनमध्ये काय करत होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे राजकारण होत आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले.  अशा आरोपबाजीमधून काँग्रेस 2019 साली होणाऱ्या पराभवाचे कारण शोधत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

रविशंकर प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 

- लंडनमधील ती पत्रकार परिषद काँग्रेस पुरस्कृत- काँग्रेसकडून 90 कोटी मतदारांचा अपमान - काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल लंडनमधील हॅकेथॉनमध्ये काय करत होते-गोपीनाथ मुंडेच्या मृत्यूचे राजकारण - 2014 साली आमचं नाही यूपीएचं सरकार होते सत्तेवर- आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध - आशीष रे यांनी लंडनमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली

लंडनमधील पत्रकार परिषदेत काय झाले होते आरोप

 भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या EVM हॅक होत असल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत असतानाच या प्रकरणी एका अमेरिकन सायबर एक्सपर्ट्सने सोमवारी खळबळजनक दावा केला होता. 2014 साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये EVM हॅकिंग झाले होते. तसेच या EVM हॅकिंगबाबत कल्पना असल्यानेच भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा आरोप या सायबर एक्सपर्ट्सने केला.  सय्यद सुजा असे या सायबर एक्सपर्ट्सचे नाव असून त्याने लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे दावे केले. लंडनमध्ये आयोजित एका हॅकेथॉनमध्ये त्याने EVM हॅक होऊ शकतात, असा दावा केला आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हे या हॅकेथॉनला सुरुवातीपासून उपस्थित होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी