नवी दिल्ली - काँग्रेसमधील काही मुद्द्यांविषयी आपल्याला असलेल्या आक्षेपांबद्दल त्या पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले की, आता सगळे काही ठीक आहे. आता आमच्या भूमिकाही एकसमान आहेत. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थरूर यांनी पक्षासोबत सलोख्याचे संबंध राखण्याचे संकेत यातून दिले आहेत.
संसद भवन संकुलातील खरगे यांच्या कक्षात त्यांच्या समवेत शशी थरूर यांनी सुमारे पावणे दोन तास चर्चा केली. खरगे व राहुल गांधी यांच्याशी अतिशय चांगली, सकारात्मक चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
थरूर यांनी आपले आक्षेप पक्षश्रेष्ठींना सांगितले काँग्रेसमधील संघटनात्मक बाबींविषयी जे आक्षेप आहेत त्याविषयीदेखील खासदार थरूर यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी गुरुवारी चर्चा केली. केरळमध्ये गेल्या १० वर्षांपासून सत्तेबाहेर असलेली काँग्रेस डाव्या आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकांत पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे थरूर यांच्या भेटीगाठींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. गेल्या आठवड्यात, केरळ विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला थरूर गैरहजर राहिले होते. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांची योग्यरीत्या दखल न घेतल्याने ते नाराज झाले होते. माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या मतदारांच्या हितसंबंधांची संसदेत काळजी घेणे हेच माझे काम आहे, असे थरूर म्हणाले.
Web Summary : Shashi Tharoor met with Mallikarjun Kharge and Rahul Gandhi, addressing concerns within the Congress party. He stated that all is now well and perspectives are aligned, signaling improved relations ahead of Kerala's upcoming elections. Tharoor emphasized his commitment to representing his constituents' interests in Parliament.
Web Summary : शशि थरूर ने मल्लिकार्जुन खड़गे और राहुल गांधी से मुलाकात की, जिसमें कांग्रेस पार्टी के भीतर की चिंताओं को दूर किया गया। उन्होंने कहा कि अब सब ठीक है और दृष्टिकोण संरेखित हैं, जो केरल के आगामी चुनावों से पहले बेहतर संबंधों का संकेत देते हैं। थरूर ने संसद में अपने मतदाताओं के हितों का प्रतिनिधित्व करने की अपनी प्रतिबद्धता पर जोर दिया।